ए. आर. रहेमान बनवणार हिंदी चित्रपट!, A. R. Rehman make Hindi Movie & also write movie script

ए. आर. रहेमान बनवणार हिंदी चित्रपट!

ए. आर. रहेमान बनवणार हिंदी चित्रपट!
www.24taas.com , झी मीडिया, चेन्नई

संगीतकार, गायक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेला ऑस्कर पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान आता एक हिंदी चित्रपट बनवणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथाही रेहमान स्वत: लिहीणार आहेत.

रेहमाननं आपलं प्रॉडक्शन वाईएम मुव्हीजच्या माध्यमातून इरोज इंटरनॅशनलसोबत मिळून एक हिंदी चित्रपट बनवायचं ठरवलंय. मात्र अजून चित्रपटाचं नावं नक्की झालेलं नाहीय. प्रेम, कला आणि स्वत:ला शोधण्याच्या विषयावर आधारित हा चित्रपट असून त्याची मूळ कल्पना आणि कथा दोन्ही रेहमानचीच आहे.

“इरोज सोबत १६ वर्षांपासूनचा जुना संबंध आहे, मात्र आता भूमिकेत वाढ झालीय”, असं रेहमान म्हणतो. शिवाय हे क्रिएटिव्ह भागीदारीचा आणखी दुसरा घटक शोधण्यासारखं आहे. इरोज इंटरनॅशनलचे मीडिया व्यवस्थापकीय संचालक सुनील लुल्ला म्हणाले, “आम्हाला खूप आनंद होतोय की, आम्ही रेहमानसोबत मिळून एका नव्या उपक्रमाची घोषणा करत आहोत. या चित्रपटद्वारं आम्ही सर्वोत्कृष्ट संगीत आणि कथा प्रेक्षकांसमोर आणू बघतोय.जेणेकरुन हा अनुभव प्रेक्षकांसाठी न विसरता येणारा असाच असेल.”

एकूणच काय तर संगीतकार रेहमानला एका रुपात बघण्यासाठी अख्ख जग आतूर झालंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, August 13, 2013, 20:27


comments powered by Disqus