Last Updated: Friday, August 16, 2013, 15:21
www.24taas.com झी मीडिया, मुंबईबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कतरिनाने यश राज बॅनरच्या ‘गुंडे’ या सिनेमासाठी नकार दिल्यानं आदित्य चोप्रा नाराज झाल्याचे समजते.
‘गुंडे’ या सिनेमासाठी कतरिना कैफ हिला ऑफर दिली होती. पण तिने नकार दिल्याने सिनेमासाठी प्रियांका चोप्राची निवड करण्यात आली. या सिनेमात रणबीर सिंह आणि अर्जुन कपूर हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा आगामी वर्षाच्या सुरूवातीला रिलीज होणार आहे.
कतरिनाला नवीन कलाकारासोबत काम करण्यात कमीपणा वाटत आहे. त्यामुळेच तिने या सिनेमाला नकार दिलाय ही बाब आता पुढे आली आहे.
कतरिना यश राज यांच्या ‘धूम-३’ या आगामी सिनेमात काम करतांना दिसणार आहे. तिच्यासोबत अमिर खानदेखील काम करणार आहे. कतरिना आणि अमिर यांचा हा पहिला सिनेमा आहे ज्यात ते दोघं सोबत काम करतांना दिसणार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 16, 2013, 15:21