Last Updated: Monday, October 22, 2012, 14:58
www.24taas.com, मुंबई बॉलीवुडचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयामुळे आणि सामाजिक जबाबदारीमुळे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पैशामागे पळणाऱ्या या दुनियेत पैशाला अधिक महत्त्व न देण्याचा एक जिवंत उदाहरण जगासमोर मांडले आहे. आमिर खानने एक-दोन नाही तर तब्बल १५० कोटी रुपयांचा जाहिरातीचा करार नाकारला आहे.
सध्या बॉलिवुड आणि क्रिकेट खेळाडूंना मोठमोठ्या जाहिराती मिळतात आणि त्यासाठी त्यांना कोट्यवधीची रक्कमही मिळते. अधिकाधिक जाहिराती मिळण्यासाठी क्रिकेटर आणि कलाकारांमध्ये एकच स्पर्धा असते. असे असताना आपल्या हातात आलेले १५० कोटी रुपयांची जाहिरात नाकारण्याचा कणखर बाणा आमिरने दाखवला आहे.
सध्या आमिर खान आणखी एका सामाजिक मुद्द्याशी संबंधित एका टीव्ही शोसाठी काम करीत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी त्याने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची निर्मिती करून जगासमोर एक आदर्श निर्माण केला होता. या शोचा समाजावर चांगला परिणामही झाला.
एका रिपोर्टनुसार आमिरने सध्या आपले जाहिरातीचे सर्व करार रद्द केले आहे.
सध्या आमिर खान आपली आई झीनत हुसैन यांच्यासह हज यात्रेसाठी शुक्रवारपासून साऊदी अरबमध्ये आहे. आपल्या आईची हजची करण्याची इच्छा आमिरने पूर्ण केली आहे.
First Published: Monday, October 22, 2012, 14:43