जेव्हा आमीर `क्वीन`बद्दल बोलला!Aamir Khan heaps praise on ‘Queen’ Kangana Ranaut

जेव्हा आमीर `क्वीन`बद्दल बोलला!

जेव्हा आमीर `क्वीन`बद्दल बोलला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं अभिनेत्री कंगणा राणावतच्या `क्वीन`ची भरभरून स्तुती केलीय. जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी रिलीज झालेला चित्रपट अनेकांच्या स्तुतीस पात्र ठरतोय. त्यात आमीरही मागे नाही. आमीरनं हा चित्रपट बघितला आणि कंगणा राणावतच्या अभिनयाचीही स्तुती केली.

ट्विटरवरून आमीरनं आपली प्रतिक्रिया दिलीय. आमीर म्हणतो, "काय चित्रपट आहे हा!!! तुम्ही नक्की क्वीन पाहा. ज्या कोणी अजून हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी जरूर पाहावा. प्रत्येक मुलीसाठी, महिलेसाठी हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे... आणि तथ्य म्हणजे प्रत्येक पुरुषानंही तो पाहावा. विकास बहल आणि त्याच्या टीमचे खूप खूप आभार त्यांनी हा चित्रपट बनवला. आणि कंगणा यू रॉक!!!"

बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या चित्रपटांमधील हा एक महत्त्वाचा महिला प्रधान चित्रपट आहे. कंगणाच्या करिअरला कलाटणी देण्याचं काम हा चित्रपट करेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014, 15:27


comments powered by Disqus