Last Updated: Thursday, August 23, 2012, 16:33
www.24taas.com,मुंबई`एक था टायगर` हिट झाल्यापासून कतरिना कैफचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या ती एकाचवेळी तीन स्टार खान सोबत काम करीत असल्यने तिचे शेड्युल सुद्धा खूपच बिझी आहे. मात्र, आमिर खान कॅटची वाट पाहत दिवस ढकलतोय. तुम्ही दोन लग्नानंतर कॅटची कशासाठी आमिर वाट पाहतोय, तसे दोघांमध्ये काही नाही. परंतु शुटींगसाठी तिची वाट पाहण्याशिवाय दुसरे गत्यंतर नाही.
कॅट सध्या ती शाहरुख खान सोबत लडाखमध्ये शूट करण्याच्या कामात व्यस्त आहे. तिकडे शिकागोमध्ये आमिर खान शूटसाठी गेल्या काही दिवसापासून तिची वाट पाहात बसला आहे. ‘एक था टायगर’च्या प्रमोशनसाठी पहिल्यांदा सलमान खानने तिला लडाखमध्ये जाण्यापासून थांबवून घेतले. त्यानंतर शाहरुखने यश चोप्रामार्फत तिची मनधरणी केल्यानंतर आता ती लडाखला पोचली आहे. तेथील शूट संपवून ती आठ ते दहा दिवसात शिकागोला पोहचणार होती. मात्र सध्या शाहरुख खानने विचार बदल्यामुळे तिचा लडाखमधील मुक्काम आणखीन काही दिवस तरी वाढणार असे दिसत आहे.
येत्या काळात तिचा आमिर खान सोबतचा ‘धूम-३’ हा चित्रपट येत आहे. आमिरला काही स्टंट सीनची प्रॅकटीस तिच्या सोबत करायची होती, मात्र काही दिवस आमिर खान सत्यमेव जयते या त्याच्या टीव्ही शो मध्ये बिझी होता. त्यानंतर कतरिना ‘एक था टायगर’च्या प्रेमोमध्ये व्यस्त होती. टायगर रिलीज झाल्यानंतर ती फ्रि झाला. मात्र आता शाहरुख ज्यावेळी तिला सोडेल त्यावेळीच ती शिकागोला जाऊन आमिरला जाणार आहे.
बॉलीवूडची ‘चिकनी चमेली’ कतरीना कैफ सध्या तीन स्टार खान सोबत काम करीत असल्याने चर्चेत आहे. तीन स्टार खान सोबत एकाच वेळी काम करण्याचा अनुभव कसा आहे, याबाबत ती सांगते, ही संधी मिळाली याबद्दल फिल्म मेकर्सचे आभार. मी या तिघासोबत काम करीत असलेल्या चित्रपटात केवळ शो पीस नसून माझा सुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण रोल आहे. मी यासाठी खूप स्ट्रगल केले असल्याने बीझी शेडयुलमध्ये सुद्धा या ऑफर चालून आल्या आहेत.
तसेच सिनेमामधील टिपीकल गर्ल अशी क्रेझ मी जपली असल्याने खऱ्या अर्थाने बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात मी अॅक्टिंग आणि लोकप्रियतेच्या बाबतीत तीनही खानांची बरोबरी करू शकत नाही, असे कॅट प्रांजलपणे कबुल करते.
First Published: Thursday, August 23, 2012, 16:24