जब तक है जान’ रेकॉर्ड ब्रेक ठरवाः आमिर, Aamir Khan wishes `Jab Tak Hai Jaan` to be huge success

जब तक है जान’ रेकॉर्ड ब्रेक ठरवाः आमिर

जब तक है जान’ रेकॉर्ड ब्रेक ठरवाः आमिर

www.24taas.com, मुंबई
दिवंगत चित्रपट निर्माते यश चोपडा यांचा अखेरचा चित्रपट ठरलेला ‘जब तक है जान’ला भरभरून यश मिळावे, अशी सदिच्छा अभिनेता आमिर खानने दिली आहे. हा चित्रपट यशजींच्या मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरवा, असेही आमिरने म्हटले आहे.

मुंबईत यश चोपडा यांच्या स्टुडियोत काल सायंकाळी ‘जब तक है जान’चा भव्य प्रिमिअर करण्यात आला. यावेळी बच्चन परिवार, शाहरुख खान, आमिर खानसह बॉलिवुडमधील दिग्गज उपस्थित होते.

यश चोपडा यांचा हा अखेरचा चित्रपट आहे आणि ते आपल्यामध्ये नाहीत, ही खूप वेदनादायक गोष्ट आहे. आम्हांला त्यांची कमतरता नेहमी भासणार आहे. मी प्रार्थना करतो की, हा चित्रपट खूप यशस्वी व्हावा आणि त्यांच्या मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरवा, असे आमिरने यावेळी बोलताना सांगितले. यशजी सारखे रोमँटिक चित्रपट कोणीच बनवू शकत नाही, असेही त्याने यावेळी ठामपणे सांगितले.

First Published: Tuesday, November 13, 2012, 23:10


comments powered by Disqus