जब तक है जान’ रेकॉर्ड ब्रेक ठरवाः आमिर

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 23:10

दिवंगत चित्रपट निर्माते यश चोपडा यांचा अखेरचा चित्रपट ठरलेला ‘जब तक है जान’ला भरभरून यश मिळावे, अशी सदिच्छा अभिनेता आमिर खानने दिली आहे. हा चित्रपट यशजींच्या मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरवा, असेही आमिरने म्हटले आहे.

काजोलला `जब तक...`च्या प्रिमिअरचं आमंत्रणच नाही!

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 21:11

जिथं सगळी फिल्मइंडस्ट्री ‘जब तक है जान’च्या प्रिमिअरसाठी अवतरली होती, तिथं यश चोप्रा यांच्या आत्तापर्यंतच्या सिनेमातील जवळजवळ सगळ्याच तारका उपस्थित होत्या. मात्र, या सगळ्या गर्दीमध्ये एक चेहरा मात्र प्रत्येकजण शोधण्याचा प्रयत्न करत होता.

कतरिना म्हणतेय, ‘सलमान माझ्या भावासारखा’

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 19:03

कतरिना कैफ आणि सलमान खानच्या रोमान्सची चर्चा तर आजही सुरू असते. त्यांचं नातं आज कोणत्या वळणावर याची उत्सुकता अनेकांना आहे.

बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 16:53

य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.

शाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं

Last Updated: Monday, November 12, 2012, 17:34

कतरिना कैफचं हिंदी खरोखरच ‘माशाल्ला’ आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला हिंदीचं ज्ञान नसूनही ती आज बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. याचं प्रमाण म्हणजे जेव्हा तिच्या हिंदीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, तेव्हा सुपरस्टार शाहरुख तिच्या मदतीला धावून आला

शाहरुख `खान`चा `जान` पाकिस्तानात `बॅन`?

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 09:50

सैफचा ‘एजंट विनोद’ आणि सलमानचा ‘एक था टायगर’ला पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाने पाकिस्तानात बंदी घातली होती. यावेळी शाहरुख खानचा ‘जब तक है जान’देखील पाकिस्तानात रिलीज होणं अशक्य झालं आहे.

कॅटला शिफॉन साडीत शूट करायचं होतं यशजींना

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 17:50

बॉलिवूडचे ख्यातकीर्त दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनामुळे त्यांची एक इच्छा अपुरी राहिल्याचं फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने सांगितलं. १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जब तक है जान’ चा प्रतिसाद आता यश चोप्रांना पाहायला मिळणार नाही.

‘जब तक…’ ठरला यशजींचा अखेरचा चित्रपट

Last Updated: Sunday, October 21, 2012, 19:38

१३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा असलेला ‘जब तक है जान’ हा बॉलिवूडचे ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय.

शाहरुखच्या `छल्ला`ची यू ट्युबवर धूम

Last Updated: Monday, October 8, 2012, 10:54

हातात गिटार घेऊन शाहरूखला स्टाईलमध्ये चालताना पाहून त्याच्या जुन्या चित्रपटांची क्लिप डोळ्यासमोर येते. रॉमेंटिक फिल्मसाठी प्रसिध्द असलेले दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मोठ्या गॅपनंतर या सिनेमाच्या दिग्दर्शनाचं केलंय. जब तक है जानचं ‘छल्ला की लब...’ गाणं यू-ट्यूबवर आतापर्यत ४४,८६,७९३ वेळा पाहिल गेलंय. शाहरूख खानने स्वतः यासाठी ट्विटरवर आपल्या फॅन्सना थॅंक्स म्हटलंय.

माझं हिंदी सिनेमातील संगीत पूर्ण झालं- रहमान

Last Updated: Saturday, September 29, 2012, 09:40

ऑस्कर पुरस्कार प्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांने आपल्या हिंदी सिनेमातील संगीत क्षेत्रातील काम पूर्ण झाल्याचं विधान केलं आहे. यश चोप्रा दिग्दर्शित आगामी ‘जब तक है जान’ या सिनेमासाठी रहमानने संगीत दिलं आहे. ‘यश चोप्रांसाठी संगीत दिल्यावर संगीतकार म्हणून आज खऱ्या अर्थाने माझं हिंदीतील काम पूर्ण झालं’, असं रहमान म्हणाला.

`जब तक है जान`ची कथा झाली `लीक`

Last Updated: Sunday, September 23, 2012, 14:15

यशराज बॅनरचा अजून एक सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या दिवाळी मध्ये “जब तक है जान“ हा यशराज बॅनरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या फिल्मचे तसे प्रोमोजही रिलीज झाले आहेत. प्रदर्शित करण्यात आलेले प्रोमोज उत्कंठावर्धक असल्यामुळे सिनेप्रेमींना “जब तक है जान” पाहण्याची उत्सुकता लागली आहे

शाहरुख-कतरीनाची जवळीक....

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 16:38

शाहरुख-कतरिना यांना घेऊन यश चोप्रा दिग्गदर्शित करत असलेला सिनेमा हा आपला आत्तापर्यंतचा सर्वाधिक रोमँटिक सिनेमा आहे, असं यश चोप्रा म्हणाले होते. सिनेमाचं आज प्रदर्शितच झालेलं पोस्चरही तशीच ग्वाही देतंय.

शाहरुख-कतरिना म्हणतायत, ‘जब तक है जान’

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 16:06

यश चोपडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या शाहरुख आणि कतरिनाच्या नव्या सिनेमाचं नाव आहे तरी काय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.