Last Updated: Friday, November 16, 2012, 17:19
www.zee24taas.com मुंबई
बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक – ऐश्वर्या यांची चिमुकली आराध्या हिचा आज वाढदिवस. १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आराध्या एक वर्षांची झालीय. आपल्या पहिल्या वाढदिवशीच आराध्याला तिच्या आई-वडिलांनी एक आलिशान कार भेट म्हणून दिलीय.
आई ऐश्वर्या राय बच्चन आणि बाबा अभिषेक बच्चन यांनी आराध्याला बीएमडब्ल्यू मिनी कूपर गिफ्ट केलीय. बिग बी अमिताभ बच्चन दिवाळीमध्ये स्वत: ही कार घरी आणताना दिसले.
तिच्यासाठी ते दिवाळीचं आणि वाढदिवसाचं नक्कीच एक खास गिफ्ट असेल. आपल्या लाडक्या आराध्याकरिता याआधी देखील अभिषेक बच्चनने ऑडी-८ कार भेट दिली होती जेव्हा ती फक्त चार महिन्याची होती. आराध्याचा पहिला वाढदिवस हा आई ऐश्वर्यासाठी नक्कीच सर्वांत जास्त खास आहे कारण प्रत्येक आई ही आपल्या मुलांसोबत जास्त वेळ असते असं अभिषेकनं म्हटलंय. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बच्चन परिवारने आपल्या घरी जलसामध्ये एका पार्टीचे आयोजन केलं होतं. यावेळी शाहरूख खान, अक्षय कुमार, ऋषि कपूर, करण जौहर या सिनेकलाकारांनी हजेरी लावली.
First Published: Friday, November 16, 2012, 16:49