प्रिती झिंटाची नेस वाडीयाविरोधात तक्रार, preity zinta files molestation complaint against ness wadia

अभिनेत्री प्रिती झिंटाची नेस वाडीयाविरोधात छेडछाडीची तक्रार

अभिनेत्री प्रिती झिंटाची नेस वाडीयाविरोधात छेडछाडीची तक्रार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने उद्योगपती नेस वाडीया यांच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केलीये. आयपीएल मॅच दरम्यान ३० मे रोजी ही घटना घडली होती.

वानखेडे स्टेडीयमच्य गरवारे पॅव्हेलियमध्ये हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. पोलिसांनी नेस वाडीया यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.




सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रिती झिंटाने नेस वाडीया विरुध्द विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. प्रितीने ही तक्रार मरिन ड्राइव्ह पोलीस स्थानकात नोंदवली आहे. नेस वाडीया हा प्रसिध्द उद्योगपती असून, तो आणि प्रिती आयपीएलमधील पंजाब इलेव्हन टीमचे एकत्रितपणे मालकदेखील आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 07:34


comments powered by Disqus