Last Updated: Saturday, June 14, 2014, 16:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमला या तक्रारीमुळे शॉक बसला आहे. माझ्याविरोधात ही खोटी तक्रार आहे. मी या प्रकरणात पूर्णत: निर्दोष आहे, असा खुलासा उद्योगपती नेस वाडियाकडून करण्यात आला आहे.
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने उद्योगपती नेस वाडीया यांच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. आयपीएल मॅच दरम्यान ३० मे रोजी ही घटना घडली होती. असे प्रितीने तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीने मी हैरान झालो आहे. माझ्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत, असे नेस वाडिया याने केले आहेत.
वानखेडे स्टेडीयमच्य गरवारे पॅव्हेलियमध्ये हा प्रकार घडल्याची प्रितीची तक्रार आहे. पोलिसांनी नेस वाडीया यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रिती झिंटाने नेस वाडीया विरुध्द विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. नेस वाडीया हा प्रसिध्द उद्योगपती असून, तो आणि प्रिती आयपीएलमधील पंजाब इलेव्हन टीमचे एकत्रितपणे मालकदेखील आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 14, 2014, 12:24