विवेक ओबेरॉय झाला `स्पायडरमॅन`!Actor Vivek Oberoy gave voice to Hindi Version of `Spiderman 2`

विवेक ओबेरॉय झाला `स्पायडरमॅन`!

विवेक ओबेरॉय झाला `स्पायडरमॅन`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

हॉलिवूड सिनेमांमध्ये आता बॉलिवूडचाही ठसा उमटू लागला आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "द अमेझिंग स्पायडरमॅन २` या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी विवेक ओबेरॉयनं आवाज दिला आहे.

मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेमी फॉक्‍स यांच्या हिंदीतील स्पायडरमॅनसाठी विवेक ओबेरॉयनं डायलॉग म्हटले आहेत. त्यांच्या इंग्लिश डॉयलॉगशी मिळत्याजुळत्या ओठांच्या हालचाली करत डायलॉग म्हणणं अतिशय अवघड काम असल्याचं विवेकनं पत्रकारांना सांगितलं.

परंतु, हे काम आल्यानंतर मी खूप आनंदी होतो आणि आता ते पूर्ण झाल्यानं मी खूष असल्याचंही विवेक म्हणाला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 20, 2014, 16:44


comments powered by Disqus