`गझनी`तील अभिनेत्री जिया खानची आत्महत्या, Actress Jiah Khan commits suicide

`गझनी` फेम अभिनेत्री जिया खानची आत्महत्या

`गझनी` फेम अभिनेत्री जिया खानची आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवुडची अभिनेत्री जिया खाननं मुंबईत आत्महत्या केली आहे. जुहू इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन तिने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

या घटनेनं सिनेवर्तुळात हळहळ व्यक्त होते आहे. अमिताभ बरोबर `निशब्द` सिनेमातून तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या सिनेमामुळं झिया खान चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आमीर खानच्या `गझनी` सिनेमातही तिची भुमिका होती. साजिद खानच्या `हाऊसफुल्ल`मध्येही ती अक्षयकुमार बरोबर चमकली होती.

झियाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र गेले काही दिवस ती नैराश्येच्या गर्तेत होती. ती बॉलिवूडपासूनही दूरच होती. आणि नैराश्य आल्यामुळेच तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013, 08:20


comments powered by Disqus