Last Updated: Friday, December 14, 2012, 22:16
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेत काढलेले फोटो वादात सापडले आहेत. हरिण, झेब्रा, रानगवा अशा विविध प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे हे फोटो त्या मुक्या प्राण्यांच्या शिकारीनंतर काढण्यात आले आहे.