Last Updated: Sunday, April 27, 2014, 15:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईएकीकडे जिथं ऐश्वर्या राय बच्चनचं चित्रपटातील रिएँट्रीबद्दल चर्चा आहे, तिथं दुसरीकडे आणखी एका गूड न्यूजची चर्चा आहे. बच्चन कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आणि बिग बी पुन्हा आजोबा होणार, अशी बातमी आहे.
ऐश्वर्या बच्चन 24 एप्रिलला जेव्हा मतदान करायला आली. तेव्हा तिनं ग्रे कलरचा ढिला अशा टी-शर्ट घातला होता. आणि शिवाय तिच्या पायातही फ्लॅट चपला होता. यावरून ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नेंट असावी, असा कयास बांधला जातोय. यापूर्वी तिला 3 वर्षाची मुलगी आराध्या आहे.
यापुर्वीही ऍश प्रेग्नेंट असल्याची चर्चा आणि बातम्या होत्या, त्यात दुसरं बाळ ऐश्वर्याची प्रायोरिटी असल्याचं बातमीत सांगण्यात आलंय म्हणूनच ती बॉलिवूडमधील आपल्या कमबॅकसाठी जास्त इंटरेस्ट दाखवत नाही. बच्चन कुटुंबातून मात्र याबाबत अजून कोणतही स्टेटमेंट देण्यात आलं नाहीय.
ऐश्वर्या आपल्या एका मुलाखतीत म्हणाली होती, “मला हे जाणवायला लागलंय की वेळ खूप लवकर जातोय. सध्या मी मुलगी आराध्याची काळजी आणि आपलं व्यावसायिक कमिटमेंट्स हे पूर्ण करण्यात व्यस्त आहे.” रिपोर्ट्सनुसार ऐश आपल्या मातृत्वाचा प्रत्येक क्षण एंजॉय करतेय आणि दुसऱ्या बाळासाठीही उत्सुक आहे. बऱ्याच काळापासून ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर आहे. तिनं अजून एकही फिल्म साईन केली नाहीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 9, 2014, 13:24