अक्षय, डिंपल यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार , Akshay, Dimple criminal complaint against

अक्षय, डिंपल यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार

अक्षय, डिंपल यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार
www.24taas.com,मुंबई

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री डिंपल कापडिया आणि तिच्या दोन्ही मुली अडचणीत आल्यात आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना यांची जबरदस्तीने सही घेतल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.

मृत्युपत्रावर राजेश खन्ना तथा काका यांची जबरदस्तीने सही घेतल्याचा आरोप करत अनिता अडवाणी हिने अभिनेत्री डिंपल कापडिया, ट्विंकल आणि रिंकी खन्नासह अक्षय कुमार यांच्याविरुद्ध वांद्रे महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर खासगी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

काका यांची प्रकृती ठीक नसतानाही या तिघांनी मृत्युपत्रावर सही घेतली. ही फसवणूक आहे. या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी अडवाणी हिने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

राजेश खन्ना यांच्या निधनानंतर आपल्याला आशीर्वाद बंगल्यातून हिसकावून बाहेर काढण्यात आले. मात्र आपण खन्ना यांच्यासोबत वास्तव्य करत होतो याची चित्रफीत असल्याने या बंगल्यात घुसखोरी केल्याचा गुन्हाही डिंपल आणि अक्षयविरुद्ध नोंदवावा, असेही अडवाणी हिचे म्हणणे आहे. गतवर्षी अनिता अडवाणी हिने कौटुंबिक अत्याचाराचीही तक्रार केली आहे.

First Published: Thursday, January 31, 2013, 12:21


comments powered by Disqus