आलियाचं घुमजाव, म्हणते मी रणबीरची चाहतीAlia Bhatt back her sentence about Ranbir Kapoor

आलियाचं घुमजाव, म्हणते मी रणबीरची चाहती

आलियाचं घुमजाव, म्हणते मी रणबीरची चाहती
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सर्वांसमोर रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवणाऱ्या आलिया भट्टनं आता आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलंय.

आपला आगामी सिनेमा ‘२ स्टेट्स’चं प्रमोशन करण्यासाठी आलिया आली असता तिला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आलिया म्हणाली, “कुठं माझं वय आणि कुठं रणबीरचं. मी त्याच्या समोर खूप लहान आहे. मी तर फक्त त्याची फॅन आहे... बस स्तुती करतांना भावनेच्या भरात मी ते बोलून गेली होती.” आपण हे चाहती म्हणून बोललो असं सांगत आलियानं रणबीरसोबत विवाह करण्याच्या वक्तव्याबाबत नकार दिला.

आलिया भट्टनं नुकतंच ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये तुला फिल्म इंडस्ट्रीत कोणासोबत लग्न करायला आवडेल असं विचारताच एका क्षणाचाही विलंब न लावता आलियानं रणबीर कपूरचं नाव घेतलं होतं.

आता आलिया म्हणाली, “मला रणबीर आवडतो. त्याच्यासोबत लग्न करण्याचा माझा काही उद्देश नाहीय. करणच्या शोमध्ये मजा मस्ती होत राहते, म्हणून कलाकारही यात फसतात. मी पण करणच्या शोची शिकार झाली.”

आलियानं आता हे म्हटलं असलं तरी तिच्या मनातलं रणबीरबद्दलचं प्रेम हे उफाळून आलंच आहे. आता यावर कतरीना काय म्हणते हे पाहावं लागेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014, 18:09


comments powered by Disqus