फोटो : कतरिना-रणबीर हातात-हात घालून फिरताना

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 14:45

कितीही प्रयत्न केला तरी प्रेम काही लपून राहत नाही म्हणतात ना तेच खरं... रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या लव्हबर्डसनं अनेकदा आपले संबंध सार्वजनिक करणं टाळलंयच... पण, त्यांचे फोटो मात्र सगळी कथा कथन करतात.

रणबीर कपूरवर जेलस फील करतो: साकिब सलीम

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 19:24

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने अतिशय कमी वेळात लोकप्रियता कमवली. या कारणाने रणबीरच्या लोकप्रियतेवर जळणारे अभिनेते बॉलिवूडमध्ये काही कमी नाहीत.

व्हिडिओ : राज कपूरच्या नातवाचा ‘लेकर हम दीवाना दिल’!

Last Updated: Thursday, May 8, 2014, 11:44

राज कपूर यांचा नातू अरमाननं रणबीर कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय.

रणबीर-कतरिना राहणार लिव इनमध्ये

Last Updated: Thursday, May 1, 2014, 16:22

बॉलिवूड स्टार रणबीर आणि कतरीना प्रेमाच्या चर्चेमध्ये आता एक बातमी आली आहे. हे दोघे लव बर्ड आता लिव-इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही आपल्या घराला सजविण्याच्या कामात व्यस्त आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार बुधवारी रणबीर आणि कतरिना या संदर्भात एका आर्किटेक्टला भेटायला गेले होते.

एकमेकांसोबत रणबीर-दीपिका मनसोक्त नाचले!

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 16:58

एके वेळची लोकप्रिय जोडी असलेल्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण मंगळवारी एका कार्यक्रमात एकमेकांसोबत वेळ चांगलाच एन्जॉय करताना दिसले.

रणबीर कपूरला का `प्रेयसी`साठी हवीय `प्रायव्हसी`?

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 17:17

मुंबईत एका न्यूज पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार अभिनेता रणबीर कपूरने वांद्र्यात एक घर खरेदी केलंय. रणबीरने अख्खा एक फ्लोअर खरेदी केला आहे.

सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला

Last Updated: Friday, April 18, 2014, 15:54

बॉलीवुड अभिनेता सलमान खान, करण जौहर, रणबीर कपूर आणि हरभजन यासोबतच अजून अनेक सेलिब्रिटी नव्याने सुरू होणाऱ्या ‘मिशन सपने’या कार्यक्रमात दिसणार आहेत.

बॉलिवूडमध्ये `इत्तेफाक`, रणबीर साकारणार `काका`

Last Updated: Thursday, April 10, 2014, 15:48

बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना ऊर्फ काका यांची भूमिका साकारण्याची संधी रणबीरला मिळणार आहे.

आलियाचं घुमजाव, म्हणते मी रणबीरची चाहती

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:09

करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सर्वांसमोर रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवणाऱ्या आलिया भट्टनं आता आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलंय.

रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट`चा लूक लीक

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:09

रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट` या सिनेमातला लूक लीक झाला आहे. रणबीरच्या या फोटोत रणबीर बिझनेस टायकूनमध्ये दिसून आला आहे.

रणबीर कपूरसोबत आलियाला करायचंय लग्न

Last Updated: Monday, April 7, 2014, 17:15

अभिनेत्री आलिया भट्टला अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करायचंय. आलिया म्हणते, मी रणबीर खूप आवडतो आणि तो खूप आकर्षक आहे.

`जेव्हा लग्न असेल, तेव्हा सांगूच`- कतरीना कैफ

Last Updated: Sunday, March 30, 2014, 15:53

अभिनेत्री कतरीना कैफ आपल्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलणंच पसंत करतेय. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान कतरीनानं तिच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर उत्तर देणं टाळलं.

अखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध?

Last Updated: Thursday, March 27, 2014, 18:12

स्पेनमधील त्या हॉट फोटोंनंतर चर्चेत आलेली रणबीर-कतरीनाची जोडी अखेर लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे हॉट कपल पुढील वर्षी म्हणजेच 2015मध्ये लग्न करू शकतात.

न होणारी `भाभी` बेबोवर अजूनही नाराज?

Last Updated: Friday, February 21, 2014, 15:03

`कॉफी विथ करण` या कार्यक्रमात कतरीनाला `भाभी` म्हणून संबोधत करीनानं कॅटचा रोष ओढावून घेतला होता... आणि कॅटचा हाच राग अद्यापही शांत झालेला नाही.

सलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर : कतरिना

Last Updated: Thursday, February 20, 2014, 17:25

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिनं पुन्हा आपल्या आणि सलमान खान यांच्या नात्यातला गोडव्याची मीडियासमोर उघड उघड चर्चा केलीय. त्यामुळे, पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया या दोघांच्या नात्याकडे उंचावल्यात.

पुन्हा लव्हस्टोरी सुरू, रणबीर-कतरिनात समेट?

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 13:13

बॉलिवूडचं हॉट कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात पुन्हा समेट झाल्याचं कळतंय. त्यामुळं त्यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा सुरू झालीय. बॉलिवूडमध्ये याची चर्चाही आता नव्यानं होतेय.

रणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 14:07

बॉलिवूडमधली हॉट जोडी म्हणून ओळखली जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्यात काहीतरी बिनसलंय. त्यांचं नातं कडवट नाही पण, थोडंफार आंबट झाल्याचंच सध्या दिसून येतंय.

‘बिग बॉस-८’मधून रणबीर करणार सलमानला बाहेर?

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:46

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक विशेष बातमी आहे... सलमान खाननं बिग बॉस ८चं होस्टिंग करणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर आता नव्या नावाचा शोध वाहिनीनं सुरु केलाय. यासाठी अभिनेता रणबीर कपूर याला बिग बॉस-८चं होस्टिंग करण्याबाबत विचारणा करण्यात आल्याचं कळतंय.

रणबीरला भेटण्यासाठी कतरीना आईसोबत मुंबईत दाखल!

Last Updated: Sunday, January 12, 2014, 18:17

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात परदेशात एकत्र केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच रणबीर एकटाच भारतात परतला...

जेव्हा दीपिका रणबीरच्या प्रेमात पडली होती...

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 15:31

निर्माता दिग्दर्शक याच्या करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करन’ या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोण पुन्हा एकदा दिसली.

कतरीना कैफनं रणबीर कपूरचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला?

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 17:28

अभिनेत्री कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबद्दलची चर्चा बॉलिवूडमध्येही चांगलीच रंगतेय. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी हे लव्हबर्ड्स एकत्र दिसतात. मात्र याबाबत कोणीही स्पष्ट वाच्यता करत नाहीय.

दीपिका देणार रणबीर-प्रियांकाला टक्कर!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 19:52

दीपिका पादूकोणही चांगल्या फॉर्मात आहे म्हणूनच तिचे स्टार सध्या उंचीवर आहे. सध्या बॉलिवूडमध्ये रिलीज झालेल्या तिच्या पाच चित्रपटांतून चार चित्रपट हे सुपरहीट ठरले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये दीपिका पादूकोणची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दीपिका पादूकोणची जाहिरातदारांमध्येदेखील मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी मोठ-मोठ्या कंपन्या या तिच्यामागे फिरत आहेत. याच कंपन्यांमधून कोका कोला या कोल्ड ड्रिंक कंपनीने दीपिकाला जाहिरातीसाठी एक चांगलीच मोठी ऑफर दिली आहे. कोका कोला या जाहिरातीसाठी दीपिकाला चार कोटी प्रति वर्षाला देण्यात येणार आहे.

`सिनेमा`साठी रणबीर-कतरीना पुन्हा एकत्र!

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 16:22

बॉलिवूडचं हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांनी भले आपांपसातील नातं सार्वजनिक करण्यास नकार दिला असेल पण हे नातं अजूनही जुळलेलं असल्याचंच वारंवार समोर आलंय. प्रेमात बुडालेल्या या जोडप्याला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय.

`मी रणबीरसोबत ना साखरपुडा करतेय, ना लग्न`

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 15:46

अभिनेत्री कतरीना कैफ आणि रमबीर कपूर यांची जोडी जमली, अशा आशयाची चर्चा आता जोर धरू लागलीय. पण, खुद्द कतरीनानं मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.

रणबीर कतरिनाच्या ‘एक्स बॉयफ्रेंड’बद्दल म्हणतो...

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 19:01

सिनेनिर्माता करन जोहर पुन्हा एकदा आपल्या टॉक शोमधून सेलिब्रिटीजला मोकळ्या गप्पा मारायला भाग पाडताना दिसतोय. त्यामुळेच त्याचा ‘कॉफी विथ करन’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच, झालेल्या भागात करनसोबत दिसले करीना कपूर आणि रणबीर कपूर...

कॅटसाठी जास्त रोमॅन्टिक कोण… सल्लू की रणबीर?

Last Updated: Sunday, November 17, 2013, 10:59

बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लव्ह अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. पण...

दीपिकानं रणबीर कपूरबद्दल सांगितलं रणवीरला!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 09:36

आपल्या एक्स-पार्टनरबद्दल सध्याच्या पार्टनरला सांगणं हे आपण ऐकलं असेलच... यातच आता नाव जोडलं गेलंय ते दीपिका पदुकोणचं... दीपिकानं रणवीर सिंहसोबत डीनर डेटला आपला आधीचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरबद्दल सांगितल्याची माहिती मिळतेय.

रणबीरवर आलिया फिदा!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:11

सध्याचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत `स्टूडंट ऑफ दि इअर` या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टला काम करायचे आहे. इंडस्ट्रीत आल्यापासून रणबीरसोबत काम करायची आपली इच्छा असल्याचे तिने अनेकांना सांगितलही आहे. महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलिया भट्टने `स्टूडंट ऑफ दि इअर` या चित्रपटातून आपली बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आ

`बेशरम`ला बंपर ओपनिंग

Last Updated: Thursday, October 3, 2013, 18:32

रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ सिनेमाने बॉक्स ऑपिसवर जोरदार कमाई करत सुरूवात केली आहे. समीक्षकांना हा सिनेमा फारसा भावला नसला, तरी प्रेक्षकांनी मात्र सिनेमा पाहायला पहिल्या दिवशी चांगलीच गर्दी केली आहे.

फिल्म रिव्ह्यू : कंटाळवाणा `बेशरम`

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 17:53

`दबंग` सिनेमातून पूर्णपणे नवा सलमान खान लोकांसमोर आणून दाखवणाऱा दिग्दर्शक अभिनव कश्यप आपला दुसरा सिनेमा इतका कंटाळणावणा बनवेल, असं वाटलं नव्हतं. मात्र `बेशरम` हा अत्यंत रटाळ सिनेमा आहे.

‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 16:15

अभिनेता रणबीर कपूरचा आज रिलीज होणारा ‘बेशरम’ची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या काही अनोख्या आणि आपल्याला माहीत नसलेल्या बाबी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 14:03

तुला वाढदिवसाला कतरिनानं काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न विचारताच अभिनेता रणबीर कपूर मीडियावर संतापला. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्यामुळंच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. मात्र तेव्हा `माइंड यूअर ओन बिझनेस` म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असं रागावलेल्या रणबीरनं उत्तर दिलं.

माझी जोडीदार मीच निवडणार- रणबीर कपूर

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 15:41

बॉलिवूडचा सध्याचा सर्वांचा लाडका असा रणबीर कपूर त्याची नवरी स्वत:च निवडणार आहे. रणबीरनं हे सर्वांसमोर त्याच्या आई समोरच कबुल केलंय. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपला आगामी चित्रपट ‘बेशरम’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणबीरनं माझी आई माझ्यासाठी नवरी शोधणार नाही, असं स्पष्ट केलं.

तुमच्या आई, बहिणीचे असे फोटो पाहून काय म्हणाल? - सलमान

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 07:36

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खानला कतरिना कैफच्या बिकिनीमधील त्या फोटोबद्दल विचारलं असता, सलमान खानने कतरिनाची बाजू घेत आपली प्रतिक्रिया दिली.

वैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल? - रणबीर

Last Updated: Thursday, September 12, 2013, 16:39

स्पेनमधल्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुट्ट्या मीडियात पाहून कतरिना कैफ खूपच भडकली होती. पण, रणबीर कपूरनं मात्र नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्यातले...’ म्हणत कानाडोळा केला. पण, आता मात्र त्याला याबद्दल बोलावंस वाटलंय.

रणबीरच्या लग्नाबद्दल जेव्हा दीपिका बोलते...

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:15

रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या साखरपुड्याच्या चर्च्यांना उधाण आलंय. साहजिकच, यावर रणबीरची पूर्व गर्लफ्रेंड दीपिका पादूकोन हिची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न या तारे-तारकांच्या अभिष्टचिंतकांना पडणं साहजिकच आहे... दीपिकानं तुमच्या या प्रश्नाला स्वत:हूनच उत्तर दिलंय.

रणबीर कपूर आणि कतरीनाचा होणार साखरपूडा?

Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:16

बॉलिवूडचं हॉट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि कतरीना कैफ लवकरच साखरपूडा करणार असल्याची चर्चा आहे. या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत बॉलिवूड आणि बॉलिवूड फॅन्समध्ये प्रचंड चर्चा सुरू होती. आपल्या नात्याबद्दल ते गंभीर असल्याचं समजतंय.

सलमान-रणबीरनं का टाळलं कॅटच्या बहिणीचं लग्न...

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 14:12

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्या बहिणीचा – नताशाचा विवाहसोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी ना सलमान खान हजर होता... ना रणबीर कपूर... कतरीनाचे जवळचे मानले जाणारे या दोघांच्याही अनुपस्थितीविषयी आता बॉलीवूड वर्तुळात चर्चा सुरू आहे.

रणबीर कपूरला हवी होती कॅट, बेशरममधून पत्ता कट!

Last Updated: Friday, August 23, 2013, 16:14

स्पेनमध्ये आताच एकत्र वेळ घालून आलेले आणि युरोपियन ट्रीपमध्ये एकत्र असणारे बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

बॉलिवूडचा SEXIEST MAN ठरलाय रणबीर!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 13:58

सध्या बहुचर्चित ‘चेन्नई एक्सप्रेस’चा शाहरुख, दबंग सलमान खान, परफेक्शनिस्ट आमीर आणि हॉट अँड सेक्सी जॉन अब्राहम या साऱ्यांना मागं टाकत रणबीर ठरतोय नंबर वन. रणबीर नंबर वन बॉलिवूडचा अॅक्टर म्हणून नाही तर तो ठरलाय सेक्सिएस्ट मॅन नंबर वन.

रणबीर-कॅटला दीपिकाचा सल्ला!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 13:18

‘जर तुम्ही स्टार आहात, पब्लिक फिगर आहात तर अशा गोष्टी तुमच्याबरोबर होणारच. पण, अशा गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हीच सावधान राहायला हवं’

रणबीर - कतरीनाच्या फोटोवर सलमान म्हणतो...

Last Updated: Thursday, August 1, 2013, 15:50

कतरीना आणि रणबीरची जोडी फॉर्ममध्ये आहे. दोघांनी स्पेनमध्ये घालवलेले दिवस काही फोटोंच्या माध्यमातून समोर आल्यानंतर तर जास्तच... याच फोटोंवर सलमानची काय प्रतिक्रिया असेल बरं...

'बेशरम' रणबीर आई-बाबांसोबत दिसणार!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 12:02

‘दबंग’ नंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप आता घेऊन येतोय ‘बेशरम’... या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रणबीर कपूर... या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात रणबीर त्याच्या आई-वडिलांसोबत म्हणजे ऋषी कपूर आणि नितू सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.

स्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 15:22

नुकतंच एका मॅगझीननं या दोघांचे फोटो छापलेत.... कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल हे फोटोच त्यांच्यापेक्षा जास्त बोलके आहेत.

कॅटचा पारा का चढला, काय केलं रणबीरनं?

Last Updated: Saturday, June 29, 2013, 13:46

तुम्ही जर प्रेमात असाल आणि तुम्ही तुमच्या साथीदारास वेळ दिला नाही तर ! नक्कीच तुमच्यात भांडणे होऊ शकतात. शहरातील बऱ्याच प्रेमीजोडप्यांच्या भांडणाचे कारण हेच असते. अशा कारणावरून भांडणे बॉलीवुड जगतातही नवीन नाहीत. असं एक भांडण सध्या चर्चेचा विषय झालं आहे. रणबीरनं कॅटची मस्करी केली आणि कॅटचाच पाराच चढला.

रेकॉर्डब्रेक... ‘ये जवानी है दिवानी’ बंपर हीट!

Last Updated: Friday, June 7, 2013, 21:46

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोन यांचा ये ‘ये जवानी है दिवानी’ यशाची एक एक पायरी पादाक्रांत करताना दिसतेय.

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड

Last Updated: Monday, June 3, 2013, 16:40

३१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या `य़े जवानी है दिवानी` सिनेमा १०० कोटी क्लबच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. या वीकेण्डमध्येच `ये जवानी है दिवानी` सिनेमाने ६२.७५ कोटींचा बिझनेस करत बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.

फिल्म रिव्ह्यू : ये जवानी है दिवानी

Last Updated: Saturday, June 1, 2013, 15:28

‘ये जवानी है दिवाणी’च्या निमित्तानं बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना एक चांगला सिनेमा पाहता येणार आहे. चित्रपट निर्माता अयान मुखर्जीनं प्रेक्षकांना या सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांना एक चांगलंच गिफ्ट दिलंय.

रणबीरला बनायचंय दीपिकाच्या मुलांचा ‘गॉडफादर’!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 09:25

आपली पूर्व प्रेयसी आणि ‘जवानी है दिवानी’ची सहकलाकार दीपिका पदूकोण हिच्या मुलांचा गॉडफादर बनायचंय, अशी इच्छा व्यक्त केलीय ‘दी रणबीर कपूर’नं...

दीपिकासमोर टरकतो रणबीर

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 12:10

अभिनेता रणबीर कपूर आपल्या सहकलाकारांबरोबर मैत्रिपूर्ण स्पर्धा ठेवणं योग्य मानतो. पण एक अशीही व्यक्ती आहे जिच्याशी स्पर्धा करणं रणबीरला भीतीदायक वाटतं...

`...त्याच्याशी तुमचं काय देणं-घेणं`

Last Updated: Saturday, May 18, 2013, 18:43

सिनेमाच्या प्रमोशनासाठी आलेल्या रणबीरला मीडियाशी बोलताना काही प्रश्न आवडले नाहीत त्यामुळे तो चांगलाच संतापला...

रणबीर कॅमेऱ्यासमोर संपूर्ण नग्न व्हायला तयार!

Last Updated: Thursday, May 16, 2013, 16:19

मी कॅमेरासमोर अगदी निर्लज्जपणे वावरतो. मला दिग्दर्शकाने सांगितलं, तर मी पूर्ण नग्न होऊन सर्व कोनांमधून माझं शरीर दाखवायला तयार आहे.

माधुरीला `किस` करण्यासाठी रणबीरची धडपड!

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 18:36

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या गालांवर किस करायला मिळावं, यासाठी अभिनेता रणबीर कपूरने दिग्दर्शक अयान कपूरला चक्क लाच दिली, असं खुद्द रणबीर कपूरनेच उघड केलं आहे.

रणबीर कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा...

Last Updated: Saturday, May 4, 2013, 13:54

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. लंडनहून परतताना ड्यूटी फ्री सामान घेऊन येणाऱ्या रणबीर कपूरला काल रात्री मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

होय, आम्ही गुंफलो होतो नात्यात - दीपिका

Last Updated: Friday, April 12, 2013, 09:10

अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ’ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. याचबद्दल बोलताना दीपिकानं रणबीरबरोबर आपल्या नात्याची कबुली देऊन टाकलीय.

रणबीर-दीपिकाचं नवं `बलम पिचकारी`

Last Updated: Thursday, April 11, 2013, 17:13

‘धर्मा प्रोडक्शन’च्या आगामी ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाची चर्चा सगळीकडेच जोरदार सुरू आहे. त्यातील ऱणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी फुल ऑन धमाल करत आहे.

दीपिका-रणबीर यांच्यात चाललंय तरी काय...

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 13:35

बॉलिवूडमधील नव्या अफेर्सची चर्चा नेहमीच सुरू असते. आणि ती चर्चा रंगते सुद्धा अगदी खुसखुशीत अशीच... या नव्या अफेयर्सबाबत बॉलिवूडमध्येही देखील उत्सुकता लागून राहिलेली असते.

ब्रेकअप के बाद : ये जवानी है दिवानी

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 11:02

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभी ठाकलीय. पूर्वीप्रमाणेच एकमेकांच्या हातात हात घालून... ब्रेक अपनंतर पहिल्यांदाच ‘ये जवानी है दिवानी’ च्या निमित्तानं रणबीर – दीपिका पुन्हा एकत्र आलेत.

ऑस्कर शर्यतीतून ‘बर्फी’ आऊट...

Last Updated: Saturday, December 22, 2012, 18:41

अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ ऑस्करच्या घोडदौडीत मागे पडलीय. ८५ व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमधून ‘बर्फी’ बाहेर पडलीय.

ऋषी- नीतू कपूर आणि रणबीर सिनेमात एकत्र!

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:32

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची जोडी ७०च्या दशकात जितकी लोकप्रिय होती, तितकीच आजही लोकांना आवडते. मध्यंतरी ‘दो दुनी चार’ सिनेमात दोघेही एकत्र दिसले होते, तेव्हा लोकांना खूप आनंद झाला होता. आगामी जब तक है जान सिनेमातही ऋषी कपूर-नीतू कपूर एकत्र पाहायला मिळतील.

३०कोटींच्या ‘बर्फी’ची कमाई १०० कोटी

Last Updated: Thursday, October 4, 2012, 10:52

बॉलिवूड क्षेत्रात चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत नाही, अशी मारण्यात येणारी बोंब चुकीची ठरत आहे. रणवीर कपूरचा ‘बर्फी’ने १०० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. हा चित्रपट ३० कोटी रूपयांमध्ये तयार करण्यात आला होता.

कतरिना, दीपिका आणि रणबीरचा `सिलसिला`

Last Updated: Monday, October 1, 2012, 16:24

‘सिलसिला’चा रिमेक बनवण्याची सध्या चर्चा बॉलिवूडमध्ये पसरलीय. यशराज फिल्मस नव्या स्टार कास्टसोबत सिलसिलाचा रिमेक बनवण्याची तयारी करत आहे.

`बर्फी` करताना वाईट वाटलं- रणबीर

Last Updated: Monday, September 3, 2012, 16:32

आपल्या आगामी ‘बर्फी’ या सिनेमामध्ये मुक-बधिर व्यक्तीची भूमिका साकारत असलेला रणबीर कपूरला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. या सिनेमात त्याला एकही डायलॉग किंवा गाणं गायची संधी मिळालेली नाही.

करीना - रणबीर सिनेमासाठी येणार एकत्र

Last Updated: Friday, July 27, 2012, 12:06

करीना कपूर आणि रणबीर कपूर... या दोन झळाळत्या स्टार्सना एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा... पण, खऱ्याखुऱ्या लाईफमध्ये चुलत भाऊ-बहिण असलेल्या या दोघांनीही आपण कधीही एकत्र रोमांटीक भूमिका करणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की आता हे दोघं कधीच एकत्र काम करणार नाहीत. पण या सगळ्यांना खोटं ठरवतं आता ही दोघंही एकत्र दिसणार आहेत...

रणबीर... कतरिना... घर आणि रात्र!

Last Updated: Saturday, July 21, 2012, 19:53

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ आपले संबंध मीडियापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात. पण काय करणार बिचारे कोण ना कोण त्यांना पकडतंच... आणि खरं काय ते बाहेर येतंच...

स्पर्म डोनेशन चांगलं काम आहे- रणबीर कपूर

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 22:53

स्पर्म डोनेशन (वीर्य दान) हे एक उत्तम समाजकार्य आहे, असं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. “स्पर्म डोनेशन हे चांगलं काम आहे. तुम्ही त्याद्वारे दुसऱ्यांना मदत करत असता.” अशा शब्दांत रॉकस्टार रणबीरने स्पर्म डोनेशनचं महत्व मान्य केलं.

‘आईफा’त विद्या – रणबीर सर्वोत्कृष्ट

Last Updated: Sunday, June 10, 2012, 12:24

सिंगापूरमध्ये आईफा पुरस्कारानं एकच धम्माल उडवून दिलीय. 13 व्या आईफा पुरस्कारांत ‘द डर्टी पिक्चर’साठी विद्या बालन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर ‘रॉकस्टार’ या फिल्मसाठी रणवीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवलं आहे.

चंदेरी दुनिया आठवड्याची!

Last Updated: Friday, March 30, 2012, 09:59

चंदेरी दुनियामध्ये काय चाललयं, याच्यावर एक दृष्टीक्षेप. या आठवड्यात बॉक्सऑफिसवर झळकणार आहे २ हिंदी आणि १ मराठी सिनेमा. त्यामुळे आठवड्याच्या चंदेरी दुनियेत रसिकांना ही मेजवानी असणार आहे. तर कोणाची दोस्ती कशी आहे. कोण आहे कोणाचा फॅन तर अभिनेत्यांना काय आवड नाही आणि आखणी काही बरचं...याबाबतच्या चंदेरी दुनियेतल्या घडामोडींवर घेतलेला थोडक्यात आढावा.

रणबीरची काय बाबा मजा आहे.....

Last Updated: Monday, March 26, 2012, 23:25

रणबीर कपूरने कपूर घराण्याचा वारसा अभिनय आणि एकाच वेळा अनेकांशी प्रेमलीलांच्या बाबतीतबी तितक्याच दमदारपणे पुढे चालवला आहे. रणबीरने आपण सर्वाथाने लायक वारसदार आहोत हे सप्रमाण सिद्ध केलं आहे.

दो दिल मिल रहे है....

Last Updated: Thursday, March 22, 2012, 20:22

नर्गिस फखरी आणि शाहिद कपूर यांचे सूत जुळल्याची बातमी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचली असेल. पण या दोघांची एकमेकांशी ओळख रणबीर कपूरने करुन दिली हे जर आम्ही सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

झी सिने ऍवार्डस- विद्या-रणबीर छा गये

Last Updated: Sunday, January 22, 2012, 18:53

झी सिने ऍवार्ड्स २०१२ च्या विनिशिएन मकाऊ येथील भव्य दिव्य सोहळ्याला अवघं बॉलिवूड लोटलं. रॉकस्टारसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर डर्टीसाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

रणबीर रॉक सुपर स्टार

Last Updated: Friday, December 16, 2011, 13:04

रॉकस्टार जरी मेगा हिट झाला नसला तरी त्याचे निर्माते इरोस एण्टरटेनमेंट यांनी केलेल्या दाव्यानुसार या सिनेमाने पहिल्या आठवड्यात जगभरात ६४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

‘रॉकस्टार’ला मिळाली क्लिन चीट!

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 10:45

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट रॉकस्टारला सेन्सॉर बोर्डाने क्लिन चीट दिली आहे. चित्रपटातील ‘फ्री तिबेट’ असे फलक अस्पष्ट केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने रॉकस्टारला य़ू/ए प्रमाणपत्र दिले आहे.

'बर्फी'मधलं अनोखं कपल

Last Updated: Friday, November 4, 2011, 11:54

एका अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकाने शाहरुखची कॉपी केली होती. प्रियांकाची ही नक्कल सगळ्यांचीच 'वाह वाह' मिळवून गेली होती. अगदी ्याच प्रकारची भूमिकाच आता प्रियंका करणार आहे. या रुपात याआधी देसी गर्लला कुणीही बघितलेलं नाही.

क्रेझ 'रॉकस्टार' रणबीरची !

Last Updated: Thursday, October 20, 2011, 14:34

रॉकस्टारचं प्रमोशन करण्यासाठी रणबीर नुकताच पोहोचला जयपूरला.आणि त्याची एक झलक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने त्याच्या फॅन्सनी हजेरी लावली. रणबीरने स्टेजवर पाऊल टाकताच एकच जल्लोष झाला. त्याची एक झलक बघण्यासाठी हजारो फॅन्स इथे हजर होते

संजूबाबाने गिफ्ट दिली 'रॉकस्टार'ला बाईक

Last Updated: Thursday, September 29, 2011, 13:02

हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण पिढीचा प्रतिनिधी अभिनेता रणबीर कपूर याला त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता संजय दत्तने तब्बल ३० लाख रुपयांची बाईक भेट म्हणून दिली.