Last Updated: Wednesday, May 22, 2013, 18:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी `हायवे` सिनेमात रणदीप हूडासोबत आलिया भट्ट दिसणार आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. हा सिनेमा आपल्यासाठी खूप खास असल्याचं आलियाने म्हटलंय.
ट्विटरवर आलिया भट्टने आपले शुटिंग दरम्यानचे फोटो अपलोड केले आहेत. `हाय़वे` सिनेमाचं शेवटचं शेड्युल सुरू असून आता शुटिंग लवकरच संपणार असल्याचं आलियाने ट्विट केलं.
फोटोफीचर अरेरे आलिया भटने हे काय केले.... 
शुटिंगच्या वेळी खूप धमाल आली. शुटिंगदरम्यान आपण खूप मस्ती केल्याचंही तिने म्हटलं. हा सिनेमा प्रेक्षकांनाही खूप आवडेल, असं आलियाचं म्हणणं आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर’नंतर आलिया भट्टचा ‘हायवे’ हा दुसार सिनेमा आहे. १३ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज हणार आहे. आलिया भट्टची मस्ती आता प्रेक्षकांना आवडते का, हे लवकरच कळेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 17:56