सोशल मीडीयावर अफवा, पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर पडसाद

Last Updated: Sunday, June 1, 2014, 19:02

सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह आणि संतापजनक पोस्ट टाकल्याने याचे पडसाद पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दिसून आले आहेत. काहींनी या हायवेवर वाहने रोखून धरल्याने काहीकाळ महामार्गावरील वाहतूक खोळंबळी होती. दरम्यान, पुणे, साताऱ्यामध्ये बंद पाळण्यात आलाय. मात्र, ही पोस्ट अफवा असल्याचे पुढे आले आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 7 जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Saturday, March 22, 2014, 20:58

मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातानंतर टँकरनं अचानक पेट घेतला. आणि यामध्ये सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद हायवेवर केमिकल टँकर उलटला

Last Updated: Saturday, March 22, 2014, 15:48

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात

पुणे-बंगळूर हायवेवर विचित्र अपघातात ४ ठार

Last Updated: Monday, March 3, 2014, 18:18

पुणे-बंगळूर हायवेवर नागठाणेजवळ सुमो-एसटी आणि ओम्नी मोटारीमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात चार ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत.

'बोल्ड सिन करायला काहीच हरकत नाही'

Last Updated: Friday, February 21, 2014, 16:58

आलियानं आपल्याला `बोल्ड` सीन करण्यात काहीही हरकत नसल्याचं जाहीर केलंय. व्यक्तिगत जीवनात आपणच आपले निर्णय घेत असल्याचं आलिया सांगते.

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, ७ ठार

Last Updated: Monday, February 17, 2014, 15:13

पुणे महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास बोटा शिवारात ट्रक आणि बोलेरो पिक-अपमध्ये भीषण अपघातात ७ जण मृत्युमुखी पडले तर ९ जण जख्मी झाले आहेत. मृतांत ३ लहान मुलांचा समावेश आहे.

ऑईल टँकरसह दोन गाड्या जळून खाक, आठ ठार

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 09:46

मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

व्हिडिओ: अभिनेत्री अलिया भट्ट झाली गायिका

Last Updated: Monday, January 20, 2014, 08:51

अभिनेत्री अलिया भट्टचा मधूर आवाज सध्या गाजतोय. तिच्या गाण्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाल्यापासून तिचे फॅन्स आणखीनच खूश झाले आहेत.

अर्धवट जळालेल्या अवस्थेत झुडुपांत आढळला `ती`चा मृतदेह

Last Updated: Thursday, January 16, 2014, 23:37

गेले अनेक दिवस गायब असलेल्या इस्टर अनुया या तरुणीचा मृतदेह भांडुपजवळ इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका झुडुपात आढळलाय. अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे एकच खळबळ उडालीय.

भरदिवसा शाळकरी मुलीचं अपहरण आणि विनयभंग

Last Updated: Thursday, December 19, 2013, 12:14

चंद्रपूर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचं शाळेसमोरूनच एका वाहनातून पाच तरुणांनी अपहरण केलं आणि तिचा चालत्या गाडीतच विनयभंग करत तिला चंद्रपूर-नागपूर महामार्गावरच्या भद्रावती शहराजवळच्या एका मंदिराजवळ गाडीतून फेकून दिलं.

आलिया भट्टच्या `हायवे` सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 14:58

दिग्दर्शक इम्तियाज अली याचा `हायवे` या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ही सिनेमा वास्तवामध्ये आशादायक दिसतो आहे. हा ट्रेलर वेगळ्याच पार्श्वभूमीवर दाखविण्यात आलाय. यामध्ये आलिया भट्ट आणि रणदीप हुडडा याचा ट्रकमधील प्रवास दाखविण्यात आलाय.

पुणे-मुंबई हायवेवर अपघात, एमबीएच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Monday, September 30, 2013, 15:19

पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळील एमटीडीसीजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं कार विरुद्ध दिशेला जात टेम्पोला धडकून हा अपघात घडला. अपघातात वाकडजवळील इंदिरा कॉलेजमध्ये एमबीए करत असलेल्या एका तरुणीसह चार विद्यार्थ्यांचा यात मृत्यू झालाय. तर एक तरुणी जखमी आहे.

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात

Last Updated: Sunday, September 8, 2013, 09:33

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आराम बसला सावर्डे-आगावे जवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात २० जण गंभीर जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, पुण्याचे ३ ठार

Last Updated: Saturday, August 17, 2013, 23:41

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टायर फुटल्याने इनोव्हा मोटार डिव्हाडरवर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

मुंबईतील द्रुतगती महामार्ग अपघातात दोन ठार

Last Updated: Friday, July 5, 2013, 13:10

पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जण ठार झालेत. बेस्ट बसने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आलिया भट्टची `हायवे`वर मस्ती!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 18:15

दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी `हायवे` सिनेमात रणदीप हूडासोबत आलिया भट्ट दिसणार आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. हा सिनेमा आपल्यासाठी खूप खास असल्याचं आलियाने म्हटलंय.

वाहनांच्या वेगावर ठेवा वचक, नाहीतर...

Last Updated: Saturday, May 18, 2013, 15:43

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर तुफान वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलीय. यामुळेच अपघातांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटलीय. यासाठी पोलिसांनी लढवलीय आयडीयाची कल्पना...

कारंजा- नागपूर हायवेवर अपघात, १३ ठार

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 21:05

यवतमाळमधील कारंजा-नागपूर हायवेवर ऍपेची कंटेनरला धडक होऊन झालेल्या अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर १९ जण जखमी झाले आहेत

मुंबई-गोवा हायवे अपघातात ३ ठार, १५ जखमी

Last Updated: Monday, March 25, 2013, 13:03

मुंबई-गोवा महामार्गावर अपघांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात ३ ठार तर १५ जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अलिया भट्टच्या सणसणीत कानाखाली!

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 20:13

बॉलिवूडची नवी नाजूक,गोड स्टार अलिया भट्ट हिला नुकतीच एक सणसणीत कानाखाली खावी लागली. दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी असलेल्या अलिया भट्टने २०१२मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

टँकर-पोलीस व्हॅनमध्ये अपघात, ३२ पोलीस जखमी

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 09:38

इतरांना सुरक्षा पुरविणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं आज दिसून आलंय. सोमवारी रात्री उशीरा पोलीस व्हॅन आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात ३२ पोलीस जखमी झालेत.

अपघातांचं सत्र सुरूच; दोन मराठी कलाकार जखमी

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 09:01

मुंबई-पुणे हायवेवर पुन्हा अपघात झालाय. यात अभिनेते भालचंद्र कदम आणि अभय राणे जखमी झाले आहेत. गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वर पुन्हा अपघात; पाच जण जागीच ठार

Last Updated: Monday, January 28, 2013, 12:57

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कार अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झालेत. मुंबईहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ‘इको’ला धडक दिल्यानं हा अपघात घडलाय.

नॅशनल हायवे नं. ९... मृत्यूचा सापळा

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 19:46

सोलापूर-पुणे-हैद्राबाद या महामार्ग क्रमांक नऊवर 2012 मध्ये 526 लोकांना जीव गमवावा लागलाय, तर 1270 लोकांना अपंगत्व आलंय. या हायवेवर असणारी धोकादायक वळणं, अकुशल ड्रायव्हर आणि खड्ड्यांमुळं अपघातांचं प्रमाण वाढत आहे.

औरंगाबाद-नगर हायवे मृत्यूचा सापळा

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:42

औरंगाबादसाठी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला आणि औरंगाबाद-पुण्याला जोडणारा हा आहे औरंगाबाद-अहमदनगर हायवे... मात्र औरंगाबादकरांच्या दृष्टीनं हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय.

नदीवर पूल, सरकारची नुसतीच हूल

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:21

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ही राज्याची शान आहे. मात्र ज्या खालापूर तालुक्यातून हा एक्सप्रेस वे गेलाय त्याच गावांमधले नागरिक अक्षरशः तारेवरची कसरत करत नदी ओलांडतात. वर्षानुवर्षे कैफियत मांडूनही पूल बांधला जात नसल्यानं सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय.

पावसाने मुंबई-गोवा हायवेवर कोंडी

Last Updated: Sunday, June 10, 2012, 23:02

पावसामुळं मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वडखळ नाका-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

आजही इस्टर्न हायवे जाम, चाकरमानी रखडले

Last Updated: Thursday, April 19, 2012, 11:28

आज दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या लोकल्स अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहेत त्यामुळं आज पुन्हा इस्टर्न एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जॅम झाला असून सुमन नगरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत.

इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 14:10

मध्य आणि हार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा ताण रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Last Updated: Sunday, January 22, 2012, 13:31

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इंडिका गाडीत जोरदार धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील पाच जण जागीच ठार झालेत.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकर पलटी

Last Updated: Friday, November 11, 2011, 08:23

मुंबईत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री एक ऑईल टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला. हा टँकर मुंबईहून नाशिककडे जात होता. टँकर पलटी झाल्यानं रस्त्यावर सर्वत्र तेलाचा तवंग पसरला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. अखेर अग्नीशमन दलानं तेलाच्या तवंगावर माती टाकल्यानं वाहतूक सुरळीत झाली.

एक्सप्रेस हायवेवर 'टोलधाड '

Last Updated: Friday, December 16, 2011, 13:05

मुंबईत त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर असलेले टोल नाके प्रवाशांची अक्षरशः लूट करतायत. टोल वसुलीच्या नावाखाली अनेकांकडून पैशाची मोठ्याप्रमाणात फसवणूक होत आहे.