रणबीर कपूरसोबत आलियाला करायचंय लग्नAlia bhatt Wants to Marry with Ranbir Kapoor

रणबीर कपूरसोबत आलियाला करायचंय लग्न

रणबीर कपूरसोबत आलियाला करायचंय लग्न
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

अभिनेत्री आलिया भट्टला अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करायचंय. आलिया म्हणते, मी रणबीर खूप आवडतो आणि तो खूप आकर्षक आहे.

करण जोहर याच्या `कॉफी विथ करण` या सेलिब्रेटी टॉक शोच्या आगामी एपिसोडमध्ये आलिया भट्ट दिसणार आहे. करणनं जेव्हा रणबीर कपूरबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न आलियाला विचारला, तेव्हा तिनं रणबीरची खूप स्तुती केली. आलिया म्हणाली, "मला वाटतं रणबीर खूप आकर्षक आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा आहे."

आपल्या इच्छेबाबत तू रणबीरची आई नितू कपूरसोबत बोलली का आणि कतरीना कैफला याबद्दल माहिती आहे का? तर यावर आलिया म्हणाली, "माझी इच्छा सगळ्यांना माहित आहे, मी सर्व रेकॉर्डवर बोललीय."

रॅपिड फायर राऊंडमध्ये जेव्हा करणनं आलियाला प्रश्न केला की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत तुला डेटवर जायला आवडेल, तर एका क्षणाचाही विलंब न लावता तिनं रणबीर कपूरचं नाव घेतलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 7, 2014, 17:15


comments powered by Disqus