Last Updated: Friday, August 2, 2013, 18:42
www.24taas.com झी मीडिया, मुंबईकरन जोहर यांचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री अलिया भट्ट आता ‘इंडियन ब्राइडल फॅशन वीक’ मध्ये भाग घेण्यास तयार झाली आहे. आलिया भट्ट ही बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि हॉट अभिनेत्री सोनम कपूर यांना सर्वाधिक स्टाइलिश मानते.
या संदर्भात तीला काही प्रश्न विचारले असता तिने सांगितले की, “स्टाइलच्या बाबतीत म्हणाल, तर सोनम कपूरच मला स्टाइलिश वाटते. तिच्याकडूच मला फॅशनमध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.” सिध्दार्थ मल्होत्राला आलिया भट्ट स्टाइलिश वाटते, पण असे तिला स्वतःला कधीही वाटत नाही. अमिताभ बच्चन यांच्या ड्रेसिंग स्टाइलच्यापुढे कोणताही अभिनेत्रा जाऊ शकणार नाही किंवा त्यांना हरवू शकणार ही असे आलिया भट्टला वाटते. ड्रेसिंग स्टाइलच्या बाबतीत अमिताभ बच्चनच सुपर स्टाइलिश आहेत, असेही ती मानते.
अभिनेत्री आलिया भट्ट हीने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच तिने तिच्या करियरला सुरूवात केली असली तरी पण आता ती ‘इंडियन ब्राइडल फॅशन वीक’ मधून वेगळ्याच रूपात आपल्यासमोर येणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 2, 2013, 18:42