बोल्ड सिन करायला काहीच हरकत नाही , alia ready for bold scene

'बोल्ड सिन करायला काहीच हरकत नाही'

'बोल्ड सिन करायला काहीच हरकत नाही'
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या आपल्या पहिल्याच सिनेमात थोडी फार घमंडी दिसणारी आलिया आता `हायवे`मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आलीय. इम्तियाज अलीनिर्मित ‘हायवे’ या सिनेमात मात्र आलिया अगदी साध्या वेशभूषेत दिसतेय.

नुकतंच, आलियानं आपल्याला `बोल्ड` सीन करण्यात काहीही हरकत नसल्याचं जाहीर केलंय. व्यक्तिगत जीवनात आपणच आपले निर्णय घेत असल्याचं आलिया सांगते.

आलियाचे वडील सिनेनिर्माते महेश भट्ट हे स्वत:देखील मर्डर, जिस्म आणि राज अशा बोल्ड चित्रपटांसाठी ओळखले जातात. अर्थातच, अशा एखाद्या बोल्ड सिनेमाची ऑफर मिळाली तर आलियाचीही काहीच हरकत नाही. बोल्ड सिनबद्दल काहीही हरकत नाही मात्र व्यावसायिक जीवनात आलिया आपल्या वडिलांचा सल्ला जरूर घेते.

आपल्या कुटुंबीयांबद्दल आलिया खूपच संवेदनशील आहे. आपल्या एखाद्या निर्णयामुळे आपल्या कुटुंबीयांना त्रास व्हावा, हे तिला मंजूर नाही असं आलिया म्हणतेय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 21, 2014, 16:56


comments powered by Disqus