Last Updated: Thursday, March 20, 2014, 21:13
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईसदाबहार अभिनेत्री आलिया भट्टवर रणबीर कपूर फिदा झाला आहे. हाय-वे चित्रपटातील हृदयस्पर्शी अभिनयामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय अलिया भट्ट ठरली आहे.
दीपिका, कॅटरिनासारख्या आघाडीच्या नायिकांना बाजूला सारून रणबीर आलियासोबत काम करण्यास उत्सुक आहे. पण आलियाचे मात्र तळ्यात-मळ्यात सुरू असल्याने रणबीरच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
"दिल है की मानता नहीं` या चित्रपटाच्या रिमेकमध्ये रणबीर-आलियाची जोडी झळकणार आहे.
पूजा भट्ट रणबीर-आलियाच्या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र आणणार आहे. पण आलिया रणबीरसोबत काम करण्यास फारशी उत्सुक नसल्याचं सांगण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 20, 2014, 19:59