कंगणाने ३ कोटींची ऑफर नाकारली

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 17:32

`क्वीन` सिनेमाच्या यशानंतर कंगणा राणावतने तब्बल ३ करोड रूपयांच्या ऑफरला कंगणाने एका झटक्यात नकार दिला आहे. एका लग्न सोहळ्यात तिला डान्स करण्यासाठी ३ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

सनी लिऑन लवकरच मराठी सिनेमात, साकारणार पोर्नस्टार!

Last Updated: Saturday, May 10, 2014, 11:31

सनी लिऑनला सध्याच्या काळात मोठ्या बॅनरचा सिनेमा मिळत नसला तरी, सनीकडे चित्रपटांची कमतरता नाही. येणाऱ्या काळात तर सनी चक्क मराठीच्या प्रेमात पडल्या सारखीच दिसणार आहे. या मागे कारणही तसंच आहे. सनी येणाऱ्या काही महिन्यांत एक मराठी सिनेमा करणार आहे.

शुक्रवारी तब्बल 10 सिनेमांची ट्रीट

Last Updated: Thursday, May 8, 2014, 21:51

या आठवड्याचा शुक्रवार आणि त्यानंतर येणारा विकेण्ड सिनेप्रेमींसाठी जणू उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला धमाका आहे. कारण या विकेण्डला सिनेप्रेमींसाठी सहा हिंदी, तीन मराठी आणि एक इग्लिश अश्या तब्बल 10 सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. लेट्स हॅव अ लूक.

`मुलगी वाचवा` अभियान हेच `जीवती रै बेटी`चं लक्ष्य

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 14:18

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध नेहमीच समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असतात. स्त्रीभ्रूणहत्येवर समाजात जागृती करण्याचं काम काही सामाजिक संघटना करत आहेत. यात भर पडावी म्हणून स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारा `जीवती रै बेटी` हा हिंदी सिनेमा येणार आहे.

प्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी

Last Updated: Sunday, May 4, 2014, 13:08

बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.

सर्वोत्कृष्ट सिनेमा `शिप ऑफ थीसियस`

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 19:13

61 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यात आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा `शिप ऑफ थीसियस`ला 2013 चा सर्वोत्कृष्ट सिनेमा घोषित करण्यात आला.

फिल्म रिव्ह्यू : निवडणुकीच्या रंगात `भूतनाथ` परतला

Last Updated: Saturday, April 12, 2014, 16:38

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा `भूतनाथ रिटर्न्स` हा सिनेमा शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय.

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 13:19

प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन झालंय. त्या ७५ वर्षांच्या होत्या. विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी लहानपणापासून चंदेरी पडदा गाजवायला सुरुवात केली.

रणबीरचा अलियाशिवाय `दिल है की मानता नही`

Last Updated: Thursday, March 20, 2014, 21:13

सदाबहार अभिनेत्री आलिया भट्टवर रणबीर कपूर फिदा झाला आहे. हाय-वे चित्रपटातील हृदयस्पर्शी अभिनयामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय अलिया भट्ट ठरली आहे.

सिनेमाच्या ऑनलाईन तिकिटावर अतिरिक्त शुल्क नाही!

Last Updated: Thursday, March 6, 2014, 11:09

तुम्ही सिनेमाला जायचा बेत आखत आहात. मात्र, तिकिट खिडकीवर जाऊन तिकिट काढणे शक्य होत नाही. किंवा गर्दी असल्याने तिकिट मिळत नाही. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तिकिट काढता. मात्र, तिथे तुम्हाच्या खिशाला र्भुदंड पडतो. आता हा र्भुदंड पडणार नाही. अतिरिक्त शुल्क घेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

'लगान'च्या भुवनला `फॅण्ड्री`चा जब्या भावला

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 13:59

मिस्टर परफेक्ट आमीर खानने फॅण्ड्री चित्रपट पाहिला आणि त्याला जब्याची भूमिका आवडलीय.

सलमानने केले रितेश देशमुखच्या ‘yellow’बद्दल ट्विट

Last Updated: Thursday, February 20, 2014, 09:46

बॉलिवुडचा दबंग खान सलमान खानने आपला मित्र धूम-३ चं जोरदार प्रमोशन बिग बॉस सिझन ७ मध्ये केले. त्यासाठी आमीर खानची धूममधील हॅट घातली आणि धूमचे टायटल साँगही गायलं. आता हा दिलदार मित्र आणि हळवा माणूस रितेश देशमुखसाठी पुढे आला आहे. रितेश देशमुखचा आगामी चित्रपट ‘यलो’बद्दल सलमान खानने ट्विट केले आहे.

फिल्म रिव्ह्यू : ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 23:38

‘चिमणी बाम्हनीन असती, तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाहीत तिला... टोच्या मारून मारून जीव घेत्यात तिचा...’

`टाइमपास`ची रेकॉर्डब्रेक कमाई, जल्लोषात सक्सेस पार्टी

Last Updated: Thursday, February 6, 2014, 20:39

टाइमपास या मराठी सिनेमाने ३० कोटींच्या वर कमाई करत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात एक मोठी भर टाकली. या रेकॉर्डब्रेक कमाईने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास देखील रचला.याच निमित्ताने टाइमपासच्या टीमने जोरदार जल्लोषात सक्सेस पार्टी आयोजित केली.

`प्राजक्ता`ला वेड लागल्यानंतर, दगडूही झाला `येडा`

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 21:03

टाईमपास सिनेमातल्या प्राजक्ताने तर आधीच आपल्याला वेड लागलं असल्याचं सांगितलंय. मात्र आपला दगडूही आता येडा झाला आहे. कारण आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, टाईमपास सिनेमा २८ कोटी रूपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय.

बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं निधन

Last Updated: Friday, January 17, 2014, 10:16

बंगाली चित्रपट अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रूग्णालयात निधन झाले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांची तब्बेत खालावली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते.

‘टाइमपास’साठी मनसे सरसावली, बनावट सीडींची होळी

Last Updated: Monday, January 13, 2014, 19:33

बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या टाइमपास सिनेमाच्या पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाचा हिसका दाखवला..फुटपाथवर पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाइमपासच्या पायरेटेड सीडीज ताब्यात घेवून त्याची होळी केली.

`टाइमपास`ला पेपरवाल्यांचा दणका!

Last Updated: Monday, January 13, 2014, 07:37

‘टाईमपास’ सिनेमा मराठी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात चांगलाच यशस्वी ठरलाय. पण, याच सिनेमावर वृत्तपत्र विक्रेते मात्र नाराज आहेत.

मराठीतील `टाइमपास`चा गल्ला १४ कोटी रूपयांचा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 20:14

टाइमपास या सिनेमानं आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एका आठवड्यातच सिनेमानं१४ कोटींचा आकडा पार केलाय. याच बरोबर प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विकेंडमध्ये राज्यभरात शोची संख्याही वाढवण्यात आली आहे.

खाकी वर्दीतला अवलिया

Last Updated: Saturday, January 11, 2014, 23:52

एरवी पोलीस म्हटलं की, खाकी वर्दीतला जनतेचा मित्र ही छबी डोळ्यांसमोर येते. मात्र या खाकी वर्दीतल्या माणसातही एखादा कलाकार असतोच. औरंगाबादमधले एक पोलीस काका सिनेमांसाठी लावण्या लिहीतात आणि पोलीस बँडच्या माध्यमातून कलेची जोपासनाही करतात.

महाराष्ट्रात होतेय मराठी सिनेमांची गळचेपी

Last Updated: Thursday, January 9, 2014, 09:22

महाराष्ट्रात मराठी सिनेमांची गळचेपी होण्याचे प्रकार अद्यापही सुरु असून येत्या शुक्रवारी रिलीज होणा-या `१९०९ ` या सिनेमाला थिअटर उपलब्ध करुन देण्यास मल्टीप्लेक्स मालकांनी नकार दिलाय.

प्रेक्षकांना वेड लागले ‘टाइमपास’चे

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 18:02

‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिलसे आमिर है...’ हा डायलॉग सध्या प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतोय. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या सिनेमानं सगळ्यांनाच भूरळ घातलीये.

मराठीत `टाईमपास` सिनेमा `कमाई`चा नवा विक्रम गाठणार?

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 09:29

टाईमपास या सिनेमाने दिवसात साडेसहा कोटी रूपयांची कमाई केली आहे. यामुळे मराठीत टाईमपास सिनेमा कमाईचा नवा विक्रम गाठेल, असं म्हटलं जात आहे.

गब्बर, `दगडू` नही डरेगा, `थ्रीडी शोले` के सामने लढेगा

Last Updated: Saturday, January 4, 2014, 22:27

मराठीतला `टाईमपास` सिनेमा हाऊस फुल सुरू असतांना, विश्लेषकांनी या सिनेमाला जाडजूड भिंग लावून पाहण्याचं सुरूच ठेवलं आहे. `टाईमपास` असं या सिनेमाचं नाव असतांना प्रकरण फारसं गंभीर घ्यायचं काही कारणचं नाहीय.

अडीच कोटी मिळूनही लोकमान्य टिळकांच्या सिनेमाचा `वनवास`

Last Updated: Friday, December 20, 2013, 22:04

स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणा-या लोकमान्य टिळकांबाबत आपलं सरकार किती संवेदनशील आहे, याचं हे ढळढळीत उदाहरण. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी केंद्र सरकारच्यावतीनं अडीच कोटी रूपये अनुदान देण्यात आलं.परंतु १३ वर्षानंतरही हा चित्रपट पूर्ण झाला की नाही, याची माहिती केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे नाही.

व्हिडिओ : तिकीटासाठी `देढफुट्या`च्या खांद्यावर मनसेचा झेंडा!

Last Updated: Monday, December 9, 2013, 22:38

‘आम आदमी पार्टी’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं मुंबईतल्या सिने इंडस्ट्रीतल्या स्टार मंडळींच्या आशाही पल्लवित झाल्यात. इतक्या की अनेकांना सिनेमासोबत राजकारणाच्या मोठ्या पडद्यावर करिअर साकारण्याचं स्वप्न पडू लागलंय. त्यातलाच एक आहे... संजय नार्वेकर.

सोहाचे नवे नखरे, बिकीनी घालायला मिळाली परवानगी

Last Updated: Saturday, November 23, 2013, 18:15

सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानने नाही नाही म्हणत बिकीनी घालण्यास राजी झाली खरी. मात्र, माझ्याच पसंतीची बिकीनी घालणार असे स्पष्ट दिग्दर्शकाला बजावले. दिग्दर्शकाने सोहाची ही मागणी मान्य केली. त्यामुळे दिग्दर्शकाची मागणी पूर्ण करताना आपली मागणीही मान्य करून घेतले. याला सोहाचे नखरे म्हणायचे की तिचं हे बिकनी प्रेम.

श्रीदेवीची मुलगी लवकरच दिसणार सिनेमात?

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 18:09

गेल्या वर्षी ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमातून पुनःपदार्पण करणाऱ्या श्रीदेवीने आपण सुपरस्टार असल्याचं सिद्ध केलं आहे. आता श्रीदेवीची थोरली कन्याही सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

कंगना राणावतकडे ‘उंगली’, बॉलिवूडबद्दल काय म्हणाली?

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:14

मायानगरीत टिकून राहायचे असेल तर तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे. कुठल्याही फिल्मी पार्श्वीभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये टिकून राहणे हीच खूप मोठी गोष्ट आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केले आहे. ती मुंबईत ‘क्रिश ३’ प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिने ही बाब सांगितली. कंगनाकडे ‘उंगली’, ‘क्वीन’, ‘रिव्हॉलव्हर राणी’ आणि ‘रज्जो’ हे चित्रपट आहेत.

एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल

Last Updated: Thursday, September 5, 2013, 17:14

मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

दिव्या भारतीच्या बहिणीला मिळणार यश?

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 17:24

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती अगदी काही चित्रपटांमध्ये झळकली. पण तिनं सगळ्यांच्याच मनावर राज्य केलं. तमिळ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या दिव्या भारतीनं वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता तिची बहीण कायनात अरोरा चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी धडपड करतेय.

९ अंक खास, अक्षय कुमारचा ‘बॉस’

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 19:33

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘बॉस’ चं ट्रेलर आज रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी त्याने आपल्या लकी अंकाचा म्हणजेच ‘नऊ’ या अंकाचा आधार घेतला आहे

अभिनेत्री कायनात सेटवर करायची चोरी

Last Updated: Friday, August 16, 2013, 08:23

बॉलिवुड अभिनेत्री कायनात अरोरा हिचा पहिला सिनेमा ‘ग्रॅड मस्ती’ हा आहे. या सिनेमामुळे ती खूप आनंदीत आहे. मात्र, आपण शुटींगच्यादरम्यान सेटवर चोरी करत होते, अशी तिनेच कबुली दिली आहे.

`लई भारी` - सलमान खान मराठी सिनेमात

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 17:10

गेल्या २० वर्षांहून जास्त काळ बॉलिवूड गाजवल्यावर आणि बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे रेकॉर्ड्स केल्यावर सलमान खान आता मराठी सिनेमा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या बातमीमुळे सलमान खानचे मराठी फॅन्स आनंदी झाले आहेत.

ईदचा मुहूर्त शाहरुखला की सलमानला लकी?

Last Updated: Thursday, August 8, 2013, 14:07

ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर फिल्म झळकवण्याची प्रथा आता किंग खाननेही सुरू केलीये. ईदच्या मुहूर्तावर किंग खान चेन्नई एक्स्प्रेस घेऊन बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सलमानप्रमाणे त्यालाही ईदचा मुहूर्त लकी ठरणार काय, याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

‘चेन्नई एक्स्प्रेस’ दुनियादारीला ‘राज’ सल्ला

Last Updated: Thursday, August 1, 2013, 15:54

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाहरूख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. निर्माते रोहित शेट्टी यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर मनसेचा विरोध मावळला.

शाहरूख 'दुनियादारी' करू नकोस - मनसे

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 16:13

दुनियादारी हा चित्रपट काढल्यास शाहरूख खानचा राज्यात एकही शो होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.

...आणि मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत

Last Updated: Friday, July 12, 2013, 13:11

फराह अख्तर याच्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने कमाल केली. रूपेरी पडद्यावरील मिल्खाने वास्तवात भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना रडविले. या सिनेमातील काही दृश्य पाहून मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत.

सतीश तारे यांना द्या श्रद्धांजली

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 14:54

आपल्या कसदार अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांचे आज अंधेरी येथील सुजय हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना आपली श्रद्धांजली द्या.

ऊर्मिला मातोंडकरचा मराठीत जलवा

Last Updated: Sunday, May 26, 2013, 15:27

‘रंगिला’ या हिंदी या चित्रपटाची मुख्य नायिका अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आता मराठीच्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. राज्यात बिबट्याचे जीवघेणे हल्ले होत आहे. यावर सुजय सुनील डहाके चित्रपट निर्मिती करीत आहे. त्यांच्या `आजोबा` या चित्रपटात ऊर्मिला काम करणार आहे.

बॉम्बे टॉकिज : नातं प्रेक्षक आणि चित्रपटाचं...

Last Updated: Saturday, May 4, 2013, 15:19

‘अक्कड बक्कड बम्बे बो अस्सी नब्बे पुरे सौ... सौ बरस का हुआ ये खिलाडी ना बुढा हुआ...’ या ओळीतला खिलाडी दुसरा तिसरा कुणीही नसून आपला भारतीय सिनेमा आहे.

`कोकणस्थ` सिनेमासाठी राज ठाकरे जाहीरातीत

Last Updated: Friday, April 26, 2013, 09:24

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मित्र महेश मांजरेकरच्या ‘कोकणस्थ’ चित्रपटाची जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे.

संजय दत्तच्या सिनेमांचे भविष्य टांगणीला

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 15:59

संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांचा दिलासा दिल्यानंतर बॉलीवुडच्या निर्मात्यांनी आनंद व्यक्त केलाय. याबाबत पोलीसगिरी चित्रपटाचे निर्माते राहुल अगरवाल यांनी संजयला मिळालेल्या दिलासाबाबत खूश असल्याचे म्हटलंय. मात्र, काही चित्रपट पूर्ण होऊ शकतात तर सहा सिनेमांचे भविष्य टांगणीला आहे.

जयप्रभा स्टुडिओसंदर्भात लता मंगेशकर यांना दिलासा

Last Updated: Thursday, February 21, 2013, 17:43

जयप्रभा स्टुडिओसंदर्भातल्या खटल्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी लता मंगेशकर यांची मालकी असलेल्या जयप्रभा स्टुडिओतील काही जमीन निवासी आणि इतर वापरासाठी खुली करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता.

विश्वरुपमच्या वादानंतर... ‘सिनेमेटोग्राफी’ कायद्यात बदल?

Last Updated: Thursday, January 31, 2013, 12:57

‘विश्वरुपम’या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार कायद्यांत बदल करण्याचा विचार करतंय. याविषयीचे संकेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी कायद्यात बदल करण्याचे संकेत दिलेत.

सिनेमांची १०० वर्ष, साठेच्या विद्यार्थ्यांचा ‘चित्रशताब्दी स्पर्श’

Last Updated: Saturday, December 22, 2012, 18:52

सिनेमा आणि तरूणाई याचं नातं काही औरच असतं... ‘अरे अक्षयने रावडी राठोड मध्ये काय फायटिंग केलीय,

`दिल्ली सफारी` थेट ऑस्करच्या शर्यतीत

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 10:31

`दिल्ली सफारी` या सिनेमाने थेट ऑस्करच्या शर्यतीत मजल मारलीय. शहरीकरण, आणि त्यामुळे निर्सगावर होणारा परिणाम हा विषय मांडण्यात आलाय दिल्ली सफारी या सिनेमात.

मी मांडवलीचे धंदे करत नाही- राज

Last Updated: Sunday, September 9, 2012, 20:45

ठाण्यात मराठी कलाकारांचा मराठमोळा थाट पाहायला मिळाला...निमित्त होतं मिफ्ता महोत्सवाच्या कलाकारांच्या दिंडीचं...महेश मांजरेकर आणि त्यांच्यासोबत मराठी कलाकारांचा जल्लोष इथे पाहायला मिळाला..ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात हा महोत्सवात राज ठाकरे यांच्या भाषणाने रंगत आणली.

कोल्हापूरकरांचा जय(प्रभा)

Last Updated: Sunday, September 9, 2012, 18:52

कोल्हापुरात जयप्रभा स्टुडियोच्या खरेदीचा व्यवहार रद्द झालाय. स्टुडीओ खरेदी करणारे पोपट गुंदेचा यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केलीय. 11 कोटींना हा स्टुडिओ विकला जाणार होता. जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले. चित्रपटसृष्टीचा हा मानबिंदू अखेर सुरक्षित राहिलाय.

सॉरी टीचर, सिनेमा खूपच अडचणीत

Last Updated: Sunday, August 26, 2012, 22:26

टीचर आणि तिचा विद्यार्थी यांच्यातील सेक्सुअल संबंधावर आधारित टॉलिवूडमधील चित्रपट `सॉरी टीचर` अडचणीत सापडला आहे.

`जयप्रभा स्टुडिओ`ची अखेर विक्री

Last Updated: Saturday, August 25, 2012, 17:45

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकला गेलाय. मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला हा स्टुडिओ 11 कोटी रुपयांना विकला गेलाय. कोल्हापूरसाठी मानबिंदू असलेल्या या स्टुडिओची विक्री झाल्याने कोल्हापूरकर मात्र नाराज झाले आहेत.

बॉलिवूड स्टारना अजमेर दर्ग्यात नो एंट्री

Last Updated: Monday, July 23, 2012, 13:35

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार तसेच बॉलिवूड स्टार आणि आपल्या मनातील ईच्छापूर्तीसाठी अनेक भाविक जयपूरमधील अजमेर दर्ग्याला भेट देत असतात. मात्र, यापुढे बॉलिवूड स्टारमंडळीना अजमेर दर्ग्याची दारे बंद करण्यात आली आहे.

जिस्म-२ नंतर सनी लिऑनच नवं शूट...

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 12:38

पोर्न स्टार सनी लिऑन 'जिस्म २' या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे. सनीने जिस्म - २ या चित्रपटाचं चित्रीकरण संपवून होताच. पुन्हा एकदा पॉर्न सिनेमा शूट केल्याचे समजते आहे. त्याचबरोबर अशीही माहिती समजते आहे की, सनी लिऑन यापुढेही आपले पॉर्न सिनेमा सुरूच ठेवणार असल्याचे कळते.

मराठीत 'नो एंट्री'

Last Updated: Friday, May 18, 2012, 13:33

बॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करणारा नो एंट्री आता मराठीत अवतरतोय. मिलींद कवडे दिग्दर्शित करत असलेल्या ‘नो एंट्री- पुढे धोका आहे’ च्या या मराठमोळ्या व्हर्जनचा गोव्यात मुहूर्त पार पडला.

'अजिंठा'ला कोर्टाचा ग्रीन सिग्नल

Last Updated: Friday, May 11, 2012, 13:31

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

शतक झालं पूर्ण... सिनेसृष्टीचं !

Last Updated: Thursday, May 3, 2012, 12:18

३ मे १९१३ चा दिवस उजाडला तोच मुळी भारतीय सिनेसृष्टीचं उज्वल भवितव्य घेऊन. हलत्या चित्रांच्या ध्यासानं पछाडलेल्या दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरीश्चंद्र' हा पहिला मूकपट निर्माण केला आणि इथूनच सिनेसृष्टीचा खऱ्या अर्थाने उदय झाला.

बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय?

Last Updated: Thursday, April 26, 2012, 11:54

अनिल कपूर आणि अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘तेज’ हा सिनेमा या आठवड्यात रिलीज होतोय.. या सिनेमात प्रेक्षकांना अँक्शन सिक्वेन्स, स्टंट्सची मेजवानी मिळणार आहे.. बाईक, गाडी, टॅक्सी यांचा वापर या सिनेमातल्या स्टंट्ससाठी करण्यात आलाय.

उद्या बॉक्स ऑफिसवर 'थ्रिलर्स'ची मेजवानी

Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:45

या वीकेण्डला बॉक्सऑफीसवर थ्रिलरची मेजवानी पाहायला मिळणार आहे. महेश भट्ट निर्मित ‘ब्लड मनी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे तर ‘बंबू’ हा कॉमिक थ्रिलरदेखील भेटीला येत आहे.यासोबत ‘चिरगूट’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे.

विद्या करणार मराठी सिनेमात प्रमुख भूमिका !

Last Updated: Thursday, March 15, 2012, 10:09

आपल्या ऐन बहराच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीकडे ढुंकूनही बघायचं नाही आणि हिंदीमध्ये काम मिळेनासं झालं की मराठी सिनेमांकडे वळण्याची मराठी अभिनेत्रींची पद्धत मोडीत कढतेय ती साक्षात 'विद्या बालन'!

'अजंठा'ची भव्य प्रेमकहाणी

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 11:21

बालगंधर्वनंतर नितीन चंद्रकांत देसाई यांचा ‘अजंठा’ हा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठीही नितीन देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. पारो आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा अजंठा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.

'सतरंगी रे' चा प्रीमिअर

Last Updated: Thursday, February 9, 2012, 11:06

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'सतरंगी रे' या रॉक बॅण्डवर आधारित मराठी सिनेमाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. यावेळी सिनेमाच्या टीमसह मराठी इंडस्ट्रीतले सेलिब्रिटीही उपस्थित होते.

बिग बी मेकअपमनच्या सिनेमात भूमिका करणार

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 15:40

बिग बी आणि जया बच्चन हे त्यांचा मेकअप मॅन दीपक सावंतच्या भोजपुरी सिनेमा गंगादेवी काम करणार आहेत

'जिस्म-२'मध्ये सनी लियॉन होणार संपूर्ण विवस्त्र

Last Updated: Thursday, January 5, 2012, 19:04

सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये नग्न पोझ द्यावी अशी पूजा भट्टची इच्छा आहे. यासाठी पूजा भट्टच्या फिशआय नेटवर्क या कंपनीने नुकतंच सनीचं न्यूड फोटो सेशन केलं. पूजाने सनीला आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि सनीकडून काय अपेक्षित आहे याची कल्पना दिली.

अप्सरा आली...

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 12:40

गुरू ठाकुर
नटरंग चित्रपटातलं माझं ‘अप्सरा आली’ प्रचंड लोकप्रिय झालं.. त्यानंतर मला अनेकांनी अनेकवेळा विचारलं ‘अप्सरा आली’ हे एका सौंदर्यवतीचे वर्णन असले तरी लिहीताना तुमच्या नजरेसमोर नेमकं कोण होतं?

गूढ काही जीवघेणे...

Last Updated: Monday, December 26, 2011, 13:51

अंकुश चौधरी
गूढकथा... एक वेगळाच प्रकार. एक वेगळाच अनुभव... काहीसा अद्भुत, घाबरवणारा.. पण, तरीही आवडणारा. आपल्याला भीतीचंही आकर्षण कसं काय असू शकतं? पण, तसं असतं खरं. त्यात एक गंमत असते. उत्सुकता असते.

'शर्यत'चा म्युझिक लाँच

Last Updated: Saturday, December 3, 2011, 18:01

ग्रामीण बाजाची खूमासदार कथा असलेला शर्यत सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. सचिन पिळगांवकर, संतोष जुवेकर, तेजश्री प्रधान, नीना कुलकर्णी या मातब्बरांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला.

येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 14:10

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.

दिवाना सलीम शाहीन

Last Updated: Thursday, November 10, 2011, 13:52

सलीम शाहीनचं नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी अत्यल्पच. सलीम शाहीन हे म्हटलं तर एका वेड्या पीराचं नाव आहे. म्हणजे शब्दाश: तो पीर नाही. पण आधी सोविएत रशियाचं आक्रमण आणि त्यानंतर तालिबानचा वरवंटा फिरलेल्या अफगाणीस्तानात अनेक वर्षे सिनेमा निर्मिती करणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे का ?