Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:11
www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबईसध्याचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत `स्टूडंट ऑफ दि इअर` या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टला काम करायचे आहे. इंडस्ट्रीत आल्यापासून रणबीरसोबत काम करायची आपली इच्छा असल्याचे तिने अनेकांना सांगितलही आहे. महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलिया भट्टने `स्टूडंट ऑफ दि इअर` या चित्रपटातून आपली बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या आलिया, इम्तियाज अली यांच्या `हायवे` या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. येणाऱ्या काळात इम्तियाज अली यांनाही रणबीरसोबत काम करायचे आहे. इम्तियाज अली `हायवे` चित्रपट पूर्ण झाल्यानंतर रणबीरला घेऊन एक चित्रपट करणार आहेत.
`हायवे` चित्रपटातील आलियाने केलेल्या भूमिकेचे काही सीन इम्तियाज अली यांनी रणबीरला दाखवले तेव्हा तोही आलियाने केलेले सीन बघून प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. रणबीर कपूर, इम्तियाज अली आणि आलिया भट्ट ही जोडी रुपरी पडद्यावर दिसणार की नाही हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 17, 2013, 18:11