`ट्विटर`वर आपल्या नावानं जोक्स पाहून आलोक नाथ म्हणतात..., Alok Nath reacts to funny tweets about him

`ट्विटर`वर आपल्या नावानं जोक्स पाहून आलोक नाथ म्हणतात...

`ट्विटर`वर आपल्या नावानं जोक्स पाहून आलोक नाथ म्हणतात...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आलोक नाथनं ट्विटरवर एकच हास्यधम्माल उडवून दिलीय. खरं म्हणजे, आपल्या नावानं जोक्सचा एक सिलसिलाच सोशल वेबसाईटवर सुरू आहे, असं ‘हम साथ साथ है...’ या सिनेमातील सलमानच्या वडीलांची भूमिका निभावणाऱ्या आलोकनाथ यांच्या काही गावीही नव्हतं... जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, तेव्हा मात्र त्यांना आपलं हसू आवरणं कठिण झालं... आणि या ट्रेन्डमध्ये तेही स्वत:चीच मजा उडवायला सामील झाले...

त्याचं झालं असं की, एका ट्विटमध्ये `हमारे देश को सिर्फ आलोक नाथ की वजह से हार्ट अटॅक के बारे में पता चला` असं म्हटलं गेलं होतं... त्यानंतर आलोक नाथ यांच्या पडद्यावरील आत्तापर्यंतच्या एकूण लोकांच्या डोक्यात निर्माण केलेल्या भूमिकांमुळे ट्विटर चाहत्यांची विनोदबुद्धी चांगलीच जागृत झाली... आणि हा ट्रेंड ट्विटरवर दिसू लागला. यानंतर जे धम्माल ट्विटची मालिका सुरू झाली ती रजनीकांत आणि संता-बंताच्या रांगेत जाऊन बसली.

ही गोष्ट जेव्हा आलोक नाथ यांना माध्यमांमधून ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा हे ‘संस्कारी बाबूंजीं’ स्वत:च स्वत:वर मनसोक्त हसले... आणि त्यांनी आपल्याला ‘आलोक नाथ’ या नावावर जे काही जोक्स मिळाले त्यातले बहुतांशी जोक्स आवडल्याचं खुल्या दिलानं मान्य केलं.

आलोक नाथ यांच्यावरील काही जोक्स…
* आलोक नाथ हे इतके संस्कारी आहेत की ते सिगारेट नाही तर अगरबत्तीचं धुम्रपान करतात

* आलोक नाथ यांच्या सीव्हीमध्ये लिहिलंय, ‘कन्यादानात एमबीए’

* शाळेत असताना आलोक नाथ शाळा बुडवत असत... आपल्या मुलीच्या लग्नाला जाण्यासाठी.

* आलोक नाथने एक बार टुटते तारे को देखके बेटी की बिदाई माँग ली

* आलोक नाथ यांना एकदा चोर भेटला... तेव्हा त्यांनी त्याला ‘पोलीस चौकी’ऐवजी ‘माता की चौकी’ला घेऊन गेले.

* आलोक नाथ यांची पार्टी म्हणजे ‘टी-पार्टी’

* आलोक नाथ यांना ट्विटरवर ‘आशिर्वाद’ बटण हवंय.

* जेव्हा आलोक नाथ यांचा जन्म झाला तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘बधाई हो... बाबुजी हुए है’

* आलोक नाथ हळू हळू चालतात, कारण... ‘बाबुजी धीरे चलना...’



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014, 12:21


comments powered by Disqus