मराठीनंतर आमिर शिकतोय आता कुठली भाषा? Amir learning news Language

मराठीनंतर आमिर शिकतोय आता कुठली भाषा?

मराठीनंतर आमिर शिकतोय आता कुठली भाषा?
www.24taas.com, मुंबई

मराठी भाषा शिकल्यानंतर आता आमिर खान आगामी `पीके` सिनेमासाठी भोजपुरी भाषा शिकत आहे. पीके सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी आमिर खानला भोजपुरी भाषा शिकावी लागत आहे. या भाषेत प्राविण्य मिळवण्याच्या उद्देशाने आमिरने कंबर कसली आहे.

गेले ४ महिने आमिर खान भोजपुरी भाषेची शिकवणी घेत आहे. उत्तर प्रदेश, बिहारची भाषा आमिर का शिकत आहे, याबद्दल प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत होता. कारण पीके सिनेमा तर राजस्थानच्या पार्श्वभूमीवर चित्रित होत आहे. मात्र यात नक्कीच काहीतरी ट्विस्ट असणार, असं आता वाटू लागलंय.


यापूर्वीही आमिर खानने आशुतोष गोवारीकरच्या लगान सिनेमासाठी अवधी भाषेची शिकवणी लावली होती. यानंतर लिमये सरांकडे मराठी भाषेचाही क्लास आमिर खानने लावला होता. मात्र ती कुठल्याही फिल्मची तयारी नसून आवड म्हणून आमिर मराठी शिकत होता.

First Published: Tuesday, April 2, 2013, 19:01


comments powered by Disqus