आमिरच्या `बहिणी`ने केला आत्मदहनाचा प्रयत्न Amir`s sister tries to burn herself

आमिरच्या `बहिणी`ने केला आत्मदहनाचा प्रयत्न

आमिरच्या `बहिणी`ने केला आत्मदहनाचा प्रयत्न
www.24taas.com, झी मीडिया, बुलंदशहर

बॉलिवूड अभिनेता अमिर खान याच्या मानलेल्या बहिणीने महविशने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये तिचा दीर ९८ टक्के भाजला. महविशने अन्य जातीतल्या मुलाशी विवाह केल्याने तिच्या जिवाला धोका होता. आमिर खानने तिची समस्या आपल्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमात मांडली होती.

`सत्यमेव जयते` या कार्यक्रमात खोट्या प्रतिष्ठेपायी केल्या जाणाऱ्या हत्यांवर एक भाग प्रसारित करण्यात आला होता. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची अशी हत्या होण्याच्या घटना भारतात अनेक ठिकाणी घडत असतात. महविशलाही अशा प्रकारचा धोका असल्याचं तिने या कार्यक्रमात म्हटलं होतं. तिच्या पतीची याच कारणावरून हत्या करण्यात आली होती.

आमिर खानने महविशला आपली बहीण मानलं होतं. तिला मुलगी झाल्यावर महविशला आमिर खानने अभिनंदनाचा संदेशही पाठवला होता. सरकारने महविशला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. तसंच इतरही मदत सुरू केली होती. तिच्या कुठल्याही नातेवाइकांना शस्त्र परवाने देण्यास नकार दिला.

मात्र गेल्या आठवड्यात ती एसएसपींना बेटायला गेली, तेव्हा तिच्याबरोबर तेथील पीआरओने अयोग्य वर्त केलं. यानंतर महविश तिच्या कुटुंबासह उपोषणाला बसली होती. तेव्हा तिला तेथून पिटाळण्यात आलं होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, June 13, 2013, 16:10


comments powered by Disqus