Last Updated: Saturday, August 24, 2013, 09:09
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई बॉलिवूडची अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ यांची सून ऐश्वर्या हिचा पारा चढल्याने अनेकजण आवाक झालेत. ती आपल्या कुटुंबावर नाही तर पत्रकारांवर चांगलीच उखडली. तिच्यावर प्रश्नांचा मारा झाल्याने ‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा पारा चढला.
‘बच्चन बहू’ तशी आपल्या मोहक हास्यासाठी आणि शब्दचातुर्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर तिचा संयम सुटला आणि ती चिडली. ‘ज्येष्ठ अभिनेत्रींना दिग्दर्शक केवळ ‘आयटम साँग’साठीच का विचारणा करतात?, असा थेट प्रश्नय अॅशला विचारला गेला. या प्रश्नानंतर तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
ऐश्वर्या ‘ज्येष्ठ’ या शब्दामुळे चिडली की ‘आयटम साँग’ या शब्दावर, कोण जाणे? संजयलीला भन्साळीच्या आगामी ‘रामलीला’ या चित्रपटात ‘आयटम साँग’ करण्यासाठी ऐश्वर्या ला विचारणा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. याआधी ऐश्वर्यानेही ‘शक्ती’ आणि ‘ बंटी और बबली’ या चित्रपटांमध्य डान्स केला आहे. त्यामुळे तू पुन्हा ‘आयटम साँग’ करणार का, असाच प्रश्न होता. त्यावर तिचा पारा चढला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 24, 2013, 09:04