Last Updated: Sunday, August 25, 2013, 19:37
www.24taas.com झी मीडिया, मुंबईबॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ‘क्रिश ३’ या सिनेमासाठी आपला दमदार आवाज दिला आहे. या सिनेमाचे निर्माते राकेश रोशन यानी अमिताभ बच्चन यांना खास विनंती केली होती.
“सकाळी ७ वाजता उठल्यानंतर दुपारी क्रिश ३ डब करण्यासाठी पोहोचलो आणि तेथे ‘क्रिश ३’ चे दिग्दर्शक, निर्माते राकेश रोशन यांनी मला आपला आवाज देण्यासाठी विचारले आणि मी या गोष्टीसाठी तयार झालो आणि तसं घडलं.” असं ७० वर्षीय अमिताभ बच्चन यांनी शनिवारी आपल्या ब्लॉगवर लिहिलं.
हृतिक रोशन हा ‘क्रिश ३’ या सिनेमात सुपरहिरोच्या भुमिकेत काम करणार आहे. त्याचा २००३ मध्ये ‘कोई मिल गया’ आणि २००६ मध्ये ‘क्रिश’ हा सिनेमा आला होता. आगामी ‘क्रिश ३’ मध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय हेदेखील महत्वाच्या भुमिकेत आहेत.
येत्या ४ नोव्हेंबरला ‘क्रिश ३’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. याच दरम्यान बीग बी आपला अतिशय लोकप्रिय असणारा रियॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा नवा सीझन लॉन्च करण्याची तयारी करत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 25, 2013, 19:29