आता हटके अमिताभ... बिग बीची नवी इनिंग, Amitabh Bachchan New Winning

आता हटके अमिताभ... बिग बीची नवी इनिंग

आता हटके अमिताभ... बिग बीची नवी इनिंग
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके करण्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हात कोणी धरु शकत नाही... आणि आता अमिताभ आणखी एक नवी इनिंग खेळणारेत. कारण, आता बिग बी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

कौन बनेगा करोडपती...या शोमधून छोट्या पडद्यावर धडाक्यात एन्ट्री करून बिग बींनी घराघरांत लोकप्रियता मिळवली. आताही असंच एक पाऊल बिग बीनीं उचललंय. बिग बी अमिताभ बच्चन आता एका मालिकेत काम करणारेत...रिएलिटी शोमधून अनेक बडे स्टार सध्या स्मॉल स्क्रीनवर झळकत असताना बिग बींनी मात्र, नव्या दिशेने वाटचाल सुरु केलीय.. एक नवी कोरी मालिका घेऊन बिग बी अमिताभ बच्चन लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणारेत

मात्र, या मालिकेचं नाव काय, मालिकेचा विषय काय असेल यावर सध्या तरी सस्पेन्स कायम ठेवण्यात आलाय. तरीही हा एक हटके, संपूर्णपणे वेगळा विषय असेल, आणि म्हणूनच आपण ही मालिका स्विकारली असं बिग बीनीं सांगितलंय. ही मालिका दिग्दर्शित करणार आहे अनुराग कश्यप. मालिकेत अमिताभ बच्चन यांच्यासह नवीन, ताज्या दमाच्या कलाकारांना संधी देण्यात येणार आहे, असं अनुरागने स्पष्ट केलंय.

एकूणच छोट्या पडद्यावर सध्या माधुरीने झलकमधून प्रेक्षकांची धकधक वाढवलीये, तर सलमान, आमीर खाननेही रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, यातला सध्या कुठलाही बडा स्टार मालिकेत काम करताना दिसत नाही, ते पाऊल आता स्वतः बॉलिवूडच्या शहेनशाहने उचललंय. त्यामुळे किंग खानसह इतर बड्या स्टार्ससाठीही बिग बीचं हे एक चॅलेंज असणार हे नक्की.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 12:33


comments powered by Disqus