‘बिग बी’नं साजरा केला १०० वर्षीय फॅनचा बर्थडे!, Amitabh Bachchan`s celebrats 100 years female fans`s Birthday

‘बिग बीं’नी साजरा केला १०० वर्षीय फॅनचा बर्थडे!

‘बिग बीं’नी साजरा केला १०० वर्षीय फॅनचा बर्थडे!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन आपल्या फॅन्सची किती काळजी घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आपल्या १०० वर्षीय फॅनचा वाढदिवस अमिताभ बच्चन यांनी साजरा करुन त्यांना वाढदिवसाची खूप मोठी भेट दिली.

बनरेनिन डिसूजा नावाच्या या महिला अमिताभ बच्चन यांच्या खूप मोठ्या फॅन आहेत. नुकताच त्यांनी आपला १००वा वाढदिवस साजरा केला. या महिलेला विस्मरणाचा आजार आहे. नातेवाईक, मित्र हे त्यांच्या लक्षात राहत नाहीत, मात्र अमिताभ बच्चन यांना त्या कधीच विसरत नाही.

दरवर्षी वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा आल्याचं ऐकत नाही, तोपर्यंत त्या जेवतही नाहीत. प्रत्येक वेळी त्यांचे नातेवाईक खोटं आश्वासन देत त्यांना समजावतात. मात्र यंदा त्यांचा १००वा वाढदिवस खूपस खास ठरला. कारण बिग बी अमिताभ यांनी एक व्हिडिओ संदेश पाठवून बनरेनिन डिसूजा यांना वाढदिवसाचं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं. या संदेश ऐकून तर बनरेनिन यांचा आनंद गगनात मावेनासाच होता.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013, 12:41


comments powered by Disqus