अमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ Amitabh Goes gaga over Nana`s acting

अमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ

अमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ
आदित्य निमकर, www.24taas.com, मुंबई

अमिताभने नाना पाटेकर यांच्या अभिनयाची स्तुती केली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी कोहराम नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र आगामी २६/११ या सिनेमातील नाना पाटेकरांचा अभिनय अमिताभ बच्चन यांना विलक्षण भावला आहे.

राम गोपाल वर्मा यांचा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत असलेला सिनेमा लवकरच रीलीज होत आहे. त्यापूर्वीच या सिनेमाचा खास शो अमिताभ यांनी पाहिला. हा सिनेमा पाहिल्यावर अमिताभ भारावून गेले. मुंबई हल्ल्यावरील हा सिनेमा पाहून अमिताभ यांना अश्रू अनावर झाले. हा सिनेमा पाहून आपण अस्वस्थ झाल्याचंही अमिताभ यांनी ट्विटरवर सांगितलं. या सिनेमाची तारीफ करताना अमिताभ यांनी नाना पाटेकरांची स्तुती केली आहे. नाना पाटेकरने या सिनेमात अप्रतिम अभिनय केला आहे. आपली भूमिका नाना पाटेकरने अतिशय संयत आणि प्रगल्भतेने साकारली असल्याचं अमिताभने म्हटलं आहे. या शिवाय अमिताभने या सिनेमात कसाबची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचंही कौतूक केलं आहे.

राम गोपाल वर्मा यांनी २६/११ची घटना घडल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याच्यासह जाऊन ताज हॉटेलची पाहाणी केली होती. राम गोपाल वर्मांचं अशा प्रकारे जाणं वादग्रस्त ठरलं होतं. मात्र त्यावर आता वर्मांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचा पहिला सीन युट्यूबवरही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

First Published: Wednesday, January 9, 2013, 17:13


comments powered by Disqus