अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य , Angelina Jolie ancient grain diet

अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य

अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य
www.24taas.com, वृत्तसंस्था , लॉस एंजल्स
हॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री आता फिगर मेन्टेन करत नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खर आहे.
`नॅशनल एनक्वायरर` नियतकालिकाने अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य सांगितले आहे. ३८ वर्षीय अँजेलिना जोलीने तिच्या त्वचेचं रहस्य शेअर केलयं.

ऑस्ट्रेलियातील एका पार्टीत अँजेलिना जोलीच्या त्वचेच्या उजळतेन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

अँजेलिना जोली तिच्या त्वचेचा नैसर्गिक तजेला मिळावा म्हणून बक व्हीट, शिया सीड्स, बाजरीसारखी भरड धान्ये वापरत आहेत. तसेच प्राचीन धान्याने बनविण्यात आलेले पदार्थ खाण्यावर अँजेलिना जोली भर देत आहे.

प्राचीन धान्याचा आहारात वापर केल्याने कांती सुंदर होते, अँजेलिना जोलीचा दावा आहे. अँजेलिना जोलीचे वजन अवघे ४२ किलो आहे.

झिरो फिगरसाठी डायट करणाऱ्या अभिनेत्री एकवेळच जेवणच घेत नसतात. सॅलड खाऊन दिवस काढतात. अँजेलिना जोली मात्र या सगळ्याप्रकारांना अपवाद ठरली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 13:25


comments powered by Disqus