काका-पुतण्याची जोडी रॅम्पवर ठरली हीट... Anil & Arjun Kapoor on Ramp

काका-पुतण्याची जोडी रॅम्पवर ठरली हीट...

काका-पुतण्याची जोडी रॅम्पवर ठरली हीट...
www.24tass.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मुलीची कमतरता भरून काढण्यासाठी पापा अनिल कपूर रॅम्पवर उतरले. दिल्लीतल्या एका फॅशन शोमध्ये सोनम कपूर आणि भाऊ अर्जुन कपूर उपस्थित राहणार होते. मात्र सोनम येऊ न शकल्यानं पापा अनिल कपूरच फॅशन शोमध्ये सहभागी झाले. पुतण्या अर्जुन सोबत रॅम्पवॉक करुन या जोडीनं सर्वांनाच खूश केलं.

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर हे दोघंही डिझायनर मसाबाचे नियमित ग्राहक आणि चाहते आहेत. मात्र कार्यक्रमात पोहोचू न शकल्यानं अनिल कपूरनं कार्यक्रमाला हजेरी लावली. पण यामुळं झालं काय, तर काका-पुतण्याची ही जोडी सर्वांचं लक्ष आकर्षून घेण्यात यशस्वी ठरली.
काळ्या रंगाची शेरवानी आणि पांढऱ्या रंगाचा चुडीदार या कपड्यात अर्जुन रॅम्पवर आला. तर काका अनिलनंही काळ्या रंगाची शेरवानी घातली.

सोनम कार्यक्रमात येऊ न शकल्यानं मला येण्याची संधी मिळाली, असं अनिल बोलतांना म्हणाला. शिवाय मला नेहमीच भरजरी कपडे घालून रॅम्पवॉक करायला आवडतो, असंही अनिलनं आवर्जुन सांगितलं. डिझायनर मसाबाचं हे कलेक्शन खास करुन नववधूंसाठी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, August 4, 2013, 11:54


comments powered by Disqus