Last Updated: Monday, November 26, 2012, 21:46
www.24taas.com, मुंबईअभिनेता आणि बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १० वर्ष सोबत राहण्याचा दावा करणारी आणि लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये असणारी अनिता अडवाणीने आता एक नवा खुलासा केला आहे. अनिताने सांगितलं आहे की, ती जेव्हा १४ वर्षाची होती तेव्हा राजेश खन्नाने एक दिवस अचानक तिला त्याच्या मिठीत घेतलं आणि तिचं दिर्घ चुंबन घेतलं. आणि त्यानंतर तिचं लैगिंक शोषण केलं असाही तिने खुलासा केलाय.
अनिता अडवाणीने राजेश खन्ना यांच्यासोबत 33 वर्षांपासून संबंध असल्याचा दावा केला आहे. राजेश खन्ना यांना ती सर्वप्रथम 13 वर्षांची असताना भेटली होती. त्यावेळी त्यांनी मिठीत घेऊन किस केले होते, असे अनिता सांगते. त्यावेळी राजेश खन्ना यांनी लँगिक शोषण केले होते. त्यावेळी जे काही घडले, त्यासाठी ती मानसिक आणि शारीरीकरित्या तयार नव्हती, असे अनिताचे म्हणणे आहे.
ती पुढे म्हणते, राजेश खन्ना यांच्यासोबतचे संबंध कोणालाच माहिती नव्हते. बदनामीच्या भीतीने ती काहीच सांगू शकली नव्हती. त्यानंतर ती जयपूरला शिक्षणासाठी गेली. तेथून दिर्घ कालावधीनंतर परतली. त्यावेळी राजेश खन्ना यांची भेट घेऊन त्या घटनेबाबत बोलली. तेव्हा राजेश खन्ना यांनी तिला लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा प्रस्ताव दिला. तो नाकारता आला नाही, असे अनिता म्हणाली.
First Published: Monday, November 26, 2012, 21:31