अनुष्काच्या मागे विराटही पोहचला श्रीलंकेत!, anushka sharma & virat kohli in shreelanka

अनुष्काच्या मागे विराटही पोहचला श्रीलंकेत!

अनुष्काच्या मागे विराटही पोहचला श्रीलंकेत!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड ब्युटी अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कथित प्रेमसंबंधांमुळे ही जोडी चांगलीच चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी, टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर असताना अनुष्का विराटला भेटण्यासाठी थेट न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्याचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. ऑकलंडमध्ये दोघं एकमेकांच्या हातात हात गुंफून फिरतानादेखील आढळले.

यावेळी, विराट कोहलीनं आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी काही मैलांचं अंतर कापलंय. नुकताच, कोहली श्रीलंकेला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये दिसून आला. महत्त्वाचं म्हणजे अनुष्का सध्या श्रीलंकेत आपल्या आगामी सिनेमा `बॉम्बे वेलवेट`च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे कोहली श्रीलंकेला का गेला असावा? याचं कारण वेगळं सांगायला नकोच...

`बॉम्बे वेलवेट` सिनेमाची संपूर्ण कास्ट आणि क्रू सध्या श्रीलंकेत आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. सिनेमात अनुष्का रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

कोहलीच्या आधी अनुष्का रणवीर सिंहला डेट करत असल्याची चर्चा होती. पण, अनुष्कानं कधीही या गोष्टीला स्वीकारलं नाही. सध्या, कोहली आणि अनुष्काची लव्हस्टोरीही याच मार्गावर आहे. दोघंही ना ही गोष्ट स्वीकारत आहेत ना या गोष्टीला अमान्य करत... त्यामुळे तुम्हाला समजायचं ते समजा...



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 11:40


comments powered by Disqus