अनुष्कानं विराटला दिला `गुडबाय किस`, anuska gives a goodbye kiss to virat kohli

अनुष्कानं विराटला दिला `गुडबाय किस`

अनुष्कानं विराटला दिला `गुडबाय किस`

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या प्रेमाची चर्चा सध्या जोरावर आहे. या दोघांबद्दल ज्यापद्धतीनं चर्चा होतायत त्यावरून नक्कीच या दोघांमध्ये काही ना काही सुरू असल्याचं समजतंय. आता तर, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी रविवारी रात्री विराट कोहलीला अनुष्कासोबतच पाहिलं गेल्याची माहिती मिळतेय. यावेळी या दोघांनी एकमेकांना ‘किस’ही केलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री जवळपास पावणे अकराच्या सुमारस विराट आणि पार्किंग एरियामध्ये होते. अनुष्कानं थोड्या ब्राईट रंगाचा टी शर्ट आणि गुलाबी ट्राऊजर परिधान केली होती तर विराट कॅज्युअल ड्रेसमध्ये होता. अनुष्कानं विराटला निरोप दिला पण, त्यापूर्वी दोघांनीही एकमेकांचं चुंबन घेतलं. अगोदर अनुष्कानं विराटला ‘किस’ केलं आणि नंतरही विराटनंही संधी साधली. दोघंही खूप आनंदी दिसत होते... आणि जेव्हापर्यंत कार पार्किंग एरियामधून निघाली नाही तेव्हापर्यंत विराट पाठिमागे वळून वळून अनुष्काला पाहतच होता.

यापूर्वीही, गेल्या महिन्यात दोघांना एकत्र कारमध्ये पाहिलं गेलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा केव्हा विराट मुंबईत येतो तेव्हा तो अनुष्काला तिच्या घरी भेटण्यासाठी नक्की जातो. अनुष्का आणि विराटची भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीत एकत्र काम करताना झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलीच जवळीक निर्माण झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 12:03


comments powered by Disqus