विराट कोहली - अनुष्का शर्मा; कोण पडलं कोणाच्या प्रेमात?, Are Anushka Sharma, Virat Kohli dating?

विराट कोहली - अनुष्का शर्मा; कोण पडलं कोणाच्या प्रेमात?

विराट कोहली - अनुष्का शर्मा; कोण पडलं कोणाच्या प्रेमात?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अनुष्का आणि विराट...? होय, सध्या या दोघांची चर्चा सुरू आहे ती त्यांच्या लव्ह अफेअरमुळे.... बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विराटच्या प्रेमात पडलीय.

बॉलिवूडमध्ये अनुष्का शर्मा आणि क्रिकेटमध्ये विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये आहेत... आणि दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, नुकतंच एका जाहीरातीत ही दोघं एकत्र दिसली आहेत. त्यानंतर, ही चर्चा सुरू झालीय. नुकतंच, विराट कोहली आणि अनुष्काला मुंबईमध्ये गाडीत एकत्र फिरताना पाहिलं गेलंय.

एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार विराट आणि अनुष्काला एका रेंज रोव्हर गाडीत एकत्र पाहिलं गेलं. ही गाडी मुंबईच्या आराम नगरहून निघाली आणि नंतर एका ठिकाणी काही वेळेसाठी थांबली. त्यानंतर ही दोघं गाडीतच गप्पागोष्टी करत होती.

बातमीनुसार, गाडीत विराट कोहली आणि अनुष्काच होते, असं सांगण्यात आलंय. दोघांच्या अगदी जवळून गप्पागोष्टी सुरू होत्या.

यावेळी अनुष्कानं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर विराटनं काळा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 09:26


comments powered by Disqus