गायक मिका सिंगला पोलिसांनी केली अटक, Arrest to singer mika singh

गायक मिका सिंगला पोलिसांनी केली अटक

गायक मिका सिंगला पोलिसांनी केली अटक
www.24taas.com, मुंबई

पंजाबी पॉप गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं अटक केली आहे. कस्टम विभागानं त्याच्याकडून १२ हजार अमेरिकन डॉलर्स आणि ३ लाख रुपये जप्त केले आहेत. बँकाकवरुन मुंबईत परतत असताना मुंबई विमानतळावर फेमाअंतर्गत मिकावर ही कारवाई करण्यात आली आहे.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिकाला काही प्रश्न विचारण्यात आले.. मात्र त्याचं योग्य उत्तर त्याला देता आलं नसल्यानं फेमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मिका सिंगविरोधात ही कारवाई करण्यात आली... मिका सिंग आणि वाद हे नेहमीच समीकरण होऊन बसलं आहे. मिका कायमचं वादाच्या भोवऱ्यात सापडत आला आहे. २००६ साली राखी सावंतला पार्टीत `किस` केल्याने प्रचंड वाद झाला होता. ते प्रकरण बरेच दिवस गाजलं होतं.

त्यानंतर २०१० मध्ये एका पत्रकाराने राखी सावंत प्रकरणावर प्रश्न विचारताच मिकाचा पारा चढला होता. त्यामुळे पत्रकाराला दिलेली वागणूक यामुळेही मिका संबंधात वाद निर्माण झाला होता. रियालिटी शोमध्ये सहभागी को-स्टरशीही मिकाचं वाजलं होतं. तर एका शोमध्ये संगीतकार अनु मलिक यांच्याशी मिकाचं वाजलं होतं. त्यामुळे मिका सिंग याच्या या वादामध्ये आता या नव्या प्रकरणाची भर पडली आहे.

First Published: Thursday, February 7, 2013, 09:06


comments powered by Disqus