राखीचा राजकीय करिअरला राम-राम!

Last Updated: Saturday, May 17, 2014, 21:20

`राष्ट्रीय आम पार्टी` नावाचा पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याचा आपला निर्णय साफ चुकला, हे आता आयटम गर्ल राखी सावंतलाही कळून चुकलंय... (हेही नसे थोडके!)

अबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 13:06

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.

राखी सावंतची राजकीय`राष्ट्रीय आम पार्टी`

Last Updated: Saturday, March 29, 2014, 09:19

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आयटम गर्ल राखी सावंतनं आता स्वतःचा नवा पक्षच काढलाय. राष्ट्रीय आम पार्टी या पक्षाची तिनं घोषणाच करून टाकली आहे.

हॉटगर्ल राखी सावंत करणार भाजपमध्ये प्रवेश

Last Updated: Saturday, March 1, 2014, 16:10

हॉटगर्ल राखी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबतची माहिती राखीनेचं मीडियाशी बोलताना दिली. राखी मुंबईतून थेट दिल्लीत गेलेय. तिला भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांची भेट घ्यायचे आहे, असे तिने सांगून टाकले.

व्हिडिओ : मी आणि उद्धव बहिण-भाऊ : राखी सावंत

Last Updated: Saturday, January 25, 2014, 16:58

`मी मराठी मुलगी आणि उद्धव ठाकरेही मराठीच... या नात्यानं आम्ही दोघं भाऊ-बहिण झालोत... आणि माझ्या भावानं माझ्याबद्दल जे म्हटलंय त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते` असं आयटम गर्ल राखी सावंतनं म्हटलंय.

राखी म्हणते, चहा विकणारा देश चालवू शकतो तर मीही चालवेन

Last Updated: Friday, January 24, 2014, 19:07

`कंट्रोव्हर्सी क्वीन` राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलीय... आणि याला कारण ठरलेत ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे... आणि अर्थातच, संधी गमावेल ती राखी कसली...

‘संजय दत्तऐवजी मला तुरुंगात टाका…’

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 16:21

संजय दत्त याला सुप्रीम कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर अवघं बॉलिवूड दु:खी झालंय. अनेकांनी संजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि आपलं दु:ख व्यक्त केलं. याच दु:खीतांमध्ये आयटम गर्ल राखी सावंतचं नाव सर्वात अगोदर घ्यावं लागेल. कारण, राखी संजयसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार झालीय.

गायक मिका सिंगला पोलिसांनी केली अटक

Last Updated: Thursday, February 7, 2013, 09:07

पंजाबी पॉप गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं अटक केली आहे. कस्टम विभागानं त्याच्याकडून १२ हजार अमेरिकन डॉलर्स आणि ३ लाख रुपये जप्त केले आहेत.

थंडीमुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा पडला-राखी सावंत

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:51

आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करताना राखी सावंत म्हणाली, थंडी वाढल्यामुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा खाली पडला आहे. आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

बदनामीपोटी राखी सावंत ठोकणार ५० कोटींचा दावा

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 10:32

काँग्रेसचे वाचाळ नेते दिग्विजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना बालिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिच्याशी केल्याने राखी जाम उखडलेय. तिने आपली बदनामी केली म्हणून दिग्विजन सिंह यांच्यावर ५० कोटी रूपयांचा खटला भरण्याची हालचाल सुरू केली आहे.

राखी सावंत देणार सेक्सचे धडे

Last Updated: Monday, November 12, 2012, 13:36

बॉलिवूडमधील आयटम गर्ल आणि नेहमी चर्चेत असणारी राखी सावंत चक्क सेक्सचे धडे देणार आहे. ती सेक्स टिचरच्या भूमिकेत दिसणार आहे.

राखी सावंत म्हणते, माझ्यापासून संभाळू राहा!

Last Updated: Monday, November 12, 2012, 12:26

अरविंद केजरीवाल राखी सावंत सारखं एक्सपोस करत असल्याचं वक्तव काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केलं होतं. त्यावरुन राखी सावंत दिग्गीराजांवर चांगलीच भडकली. दिग्विजयसिहांचं मानसिक संतूलन ढळल्याची टीका तिनं केलीय. माझ्यापासून सावध राहा, असा सल्ला देताना दिग्विजयसिंह मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.

केजरीवाल म्हणजे राखी सावंत - दिग्विजय सिंग

Last Updated: Sunday, November 11, 2012, 21:09

आपल्या वाचाळतेमुळे प्रसिद्ध असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी `इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. यापूर्वी एकदा केजरीवालांना हिटलर म्हटल्यानंतर आता दिग्विजय सिंगांनी केजरीवालांना राखी सावंत असं संबोधलं आहे.

राखी सावंत करणार केजरीवालांची ‘पोल खोल’!

Last Updated: Monday, October 29, 2012, 09:45

आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत ही बेधडक विधानं करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. यावेळी राखी सावंत सिनेक्षेत्रातली व्यक्ती सोडून चक्क अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. राखी सावंतने केजरीवालांना चक्क भगोडा (पळपुटा) म्हणत त्यांचा अपमान केलाय.

आयटर्म गर्ल राखी सावंतची आता `केजरीवालांवर नजर`

Last Updated: Friday, October 26, 2012, 14:00

ट आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच आपल्या प्रतापाने चर्चेत राहणारी आता नव्याच फंद्यात पडली आहे. राखी सावंतची नजर आता ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर पडली आहे.

राखी सावंतची फॅशन डिझायनरला शिवीगाळ

Last Updated: Saturday, October 6, 2012, 15:55

आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा वादात सापडलीये. राखी सावंतनं एका फॅशन डिझायनरला शिवीगाळ केलीये. पूजा शुक्ला असं या फॅशन डिझायनरचं नाव आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आलीये.

वीणा, राखी आणि लैला खान!

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 16:53

लैला खान या अभिनेत्रीच्या खूनाचं गूढ पूर्णतः उकललंही नसलं, तरी बॉलिवूडमध्ये या घटनेवर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. लैला खान आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना घेऊन काढलेल्या ‘वफा’ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सावंतच या मर्डर मिस्ट्रीवर सिनेमा बनवणार आहेत.

राखी सावंत म्हणते, आमिर खान चोरटा

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:19

‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय, तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत राहिलाय. आता या चर्चेमध्ये राखी सावंतही सहभागी होतेय. आयटम गर्ल राखीच्या म्हणण्यानुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पना ही तिची आहे आणि आमीर खाननं ही संकल्पना चोरली आहे.

सलमान होणार राखीचा गॉडफादर

Last Updated: Monday, January 9, 2012, 09:46

श्वास रोखून धरायला लावणारी बातमी आता तुम्ही वाचणार आहात. बॉलिवूडमध्ये आपलं स्वत:चा ‘विशेष’ असं स्थान निर्माण करणारी ‘अभिनय संपन्न’ अदाकारा राखी सावंत हिने आता चक्का सलमान खानला आपलं गॉडफादर होण्यासाठी गळ घातली आहे. आता हे ऐकल्यानंतर बॉलिवूडमध्ये फक्त त्सूनामी यायची बाकी राहिली आहे. बिग बॉस 5 च्या ग्रँड फिनालेमध्ये राखीने आपल्या परफॉर्मन्सचे जलवे दाखवले त्यानंतर तिने सल्लूमियाला गाठलं.

राखीने केलं सनी लियॉनचं 'वस्त्रहरण'

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:04

आता सनी लियॉन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमाच्या शुटींगसाठी सज्ज झाली आहे. पण, फाटक्या तोंडाची राखी सावंत मात्र सनी लियॉन आणि महेश भट्ट या दोघांवरही चांगलीच उखडली आहे.

आयटम गर्लचा टॅग राखीसाठीच 'राखी'व!

Last Updated: Sunday, January 1, 2012, 08:58

राखी सावंत म्हणजे बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल. मात्र आता बॉलिवूडच्या आघाडीच्या तारकांनी राखीची जागा घेतल्यान सध्या राखी चांगलीच गुश्शात आहे. या वर्षी तरी कतरिना, करीना, मल्लिका या आघाडीच्या तारकांनीच राखीची छुट्टी केलेली दिसतेय.

बयाँ ए राखी की राखी बया?

Last Updated: Thursday, November 10, 2011, 18:27

राखी सावंतला कसंही करुन कायम प्रकाशझोतात राहण्याचा फंडा चांगलाच अवगत झाला आहे. राखीने अंगी शून्य कर्तुत्व असताना वादग्रस्त विधानं करुन आपलं करिअर कसं बनवलं ही एक उत्तम केसस्टडी होऊ शकते.