आराध्याचा पहिली छबी... , beti b`s first photograph

आराध्याची पहिली छबी...

आराध्याची पहिली छबी...
www.24taas.com, मुंबई
ऐश्वर्या रॉय-बच्चन गरोदर असल्यापासून जगभर चर्चेत असणाऱ्या तिच्या बाळाची छबी शेवटी मिडियात प्रसिद्ध झालीच.

ऐश्वर्याच्या मुलगी दिसते कशी? याबद्दल बच्चन कुटुंबीयांनी आजतागयत सस्पेंस कायम ठेवला होता. मीडियापासून आराध्या आणि तिचे फोटोही दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच बच्चन फॅन्सची उत्सुकता प्रचंड ताणली गेली. अॅश-अभीची मुलगी दिसायला कशी असेल? हा प्रश्न त्यांना आराध्याच्या जन्मानंतर कित्येक महिने उलटून गेलेत तरी सतावतोय.

पण, अखेरीस ऐश्वर्या आणि अभिषेकचं बाळ पाहण्यास फार आतूर असलेल्या चाहत्यांना शेवटी आराध्याचे दर्शन घडलेच. जन्माला आल्यापासून आराध्याचे निरनिराळे फोटो दाखवून अफवा पसरवण्यात आल्या, पण आता तुम्ही पाहत असलेला आराध्याचा हा फोटो अगदी खराखुरा आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात आराध्या हिला पाहायला मिळाल्यानं त्यांचे चाहतेही फार खूश आहेत.

सध्या, अभिषेक बच्चन शिकागोला यशराज बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘धूम-३’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. इथं आता त्याला सोबत करण्यासाठी ऐश्वर्या आणि आराध्याही रवाना झालीय. शिकागोला रवाना होत असतानाच मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर छोटुकल्या आराध्याची झलक पाहायला मिळाली. ऐश्वर्याच्या कुशीत झोपलेल्या आराध्याला सेलिब्रिटी फोटोग्राफर विराल भयानी याने आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय. हा फोटो मिळवण्यासाठी विरालला फार मेहनत करावी लागली कारण यावेळी ऐश्वर्या लोकांच्या घोळक्यात पुढे सरकत होती. त्यामुळे आराध्याचे फोटो काढण्यास कठीण जात होते. अखेरीस त्यांना सफलता मिळाली आणि आराध्याचे फोटो कॅमेरात कैद केले.

First Published: Wednesday, September 19, 2012, 19:03


comments powered by Disqus