अमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह! Big B is the best in Bollywood

अमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह!

अमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह असल्याचं स्पष्ट झालंय.. `ब्रिटीश आशियाई साप्ताहिक इस्टर्न आय`ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभचं सर्वोत्कृष्ट असल्याचं समोर आलंय.. भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सर्वे करण्यात आला..

बिग बी अमिताभ बच्चन... स्टार ऑफ द मिलेनिअर.. आणि आता बॉलिवूडचे शहेनशाह.. सात हिंदुस्तानीसिनेमातून बिग बींनी करिअरची सुरुवात केली.. मात्र, बॉलिवूडमधलं हे स्थान मिळवण्यासाठी अमिताभ बच्चन यांना खूप स्ट्रगल करावं लागलं.. एकापाठोपाठ एक तब्बल 12 सिनेमा फ्लॉप गेल्यानंतर अखेर जंजीर सिनेमाने अमिताभ बच्चनला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.. त्यानंतर अमिताभ यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही.. 40 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक हीट सिनेमा बिग बींनी दिले आणि म्हणूनच मादाम तुसाँमध्ये मेणाचा पुतळा उभारण्यात आलेले बिग हे पहिले बॉलिवूड अभिनेता आहेत... सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली चाहत्यांची मते, तसंच अभिनेत्यांचा बॉक्सऑफिस रिपोर्ट, समीक्षकांची पसंती या आधारावर बिग बींच बॉलिवूडचा शहेनशाह असल्याचं सिद्ध झालंय..

या यादीत दिलीप कुमार दुस-या स्थानावर, शाहरुख खान तिस-या स्थानावर, धकधक गर्ल माधुरी दीक्षित चौथ्या स्थानावर, तर शोमॅन राजकपूर पाचव्या स्थानावर आहेत.. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्यांनी आपलं वर्चस्व गाजवलंय.. मात्र, तरीही ख-या अर्थाने बॉलिवूडवर गारुड आहे ते शहेनशाह अमिताभ बच्चन यांचच..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 28, 2013, 17:11


comments powered by Disqus