जेव्हा, बिग-बी पोझ देऊन 'रिक्षा'समोर उभे राहतात..., big b shooting for dabbu ratnani calendar

जेव्हा, बिग-बी पोझ देऊन 'रिक्षा'समोर उभे राहतात...

जेव्हा, बिग-बी पोझ देऊन 'रिक्षा'समोर उभे राहतात...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

चर्चित फोटोग्राफर डब्बू रत्नानी याचं वार्षिक कॅलेंडरचं शूट नुकतंच पार पडलंय. या कॅलेंडरमध्ये महानायक बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. त्यांनी नुकतीच या फोटोशूटला हजेरी लावली.

या कॅलेंडरवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या फोटोंमध्ये ७१ वर्षीय अमिताभ बच्चन टक्सूडो परिधान करून एका ऑटोरिक्षासमोर पोझ देऊन उभे राहिलेले दिसणार आहेत.

या फोटोशूटचा अनुभव अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांशीही शेअर केलाय... तो ट्विटरच्या माध्यमातून. ‘डब्बू रत्नानीच्या वार्षिक कॅलेंडरसाठी रिक्षासोबत... डब्बू रत्नानीसाठी कॅलेंडर शूट, टक्स, शेड्स आणि ऑटोरिक्षा’. आणखी एका फोटोमध्ये ते रत्नानी आणि त्याची छोटी मुलगी मारिया हिच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहेत.

बिग बी यांनी एखाद्या फोटोग्राफरसाठी फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाही... त्यांनी याअगोदरही रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 26, 2013, 16:02


comments powered by Disqus