Last Updated: Sunday, April 20, 2014, 09:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई कतरीना कैफ आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचा शोध चालूच ठेवला आहे. असे असताना आता बिपाशा बसु आणि हरमन बवेजा यांनीही नव्या घराचा शोध सुरु केला आहे. ते लवकरच विवाह करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचे घरासाठी प्रयत्न आहे.
आपल्या संबंधाबाबत ते खुलेआम बोलत नसले तरी त्यांनी त्याचा इन्कार केला नाही. हे दोघ लवकच लग्न करणार आहेत. दोघेही वरळी येथे घर शोधत असल्याची माहिती हाती आली आहे. बिपाशा आणि हरमन मुंबईत अनेक ठिकाणी घर पाहण्यासाठी गेले होते. काही आठवड्यापूर्वी त्यांनी अपार्टमेंट जाऊन पाहाणी केली. यामध्ये दोन ठिकाणी त्यांनी घर पसंत पडल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक दिवस दोघे डेटिंग करीत आहेत. ते लवकरच विवाह बंधनात अडकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. बिपाशाचे जॉनशी ब्रेकअप झाल्यानंतर ती एकटी पडली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, April 19, 2014, 22:17