बिपाशा आणखी एका `हॉरर`साठी सज्ज , bipasha`s one more horror film

बिपाशा आणखी एका `हॉरर`साठी सज्ज

बिपाशा आणखी एका `हॉरर`साठी सज्ज
www.24taas.com, मुंबई
नुकत्याच रिलीज झालेल्या हॉरर सिनेमा ‘राज-३’मुळे बिपाशा बासू सध्या चर्चेत आहे. ‘राज -३’च्या मिळलेल्या यशावर न थांबता बिपाशा बासू ने स्वतःच्या पारड्यात अजून एक हॉरर चित्रपट मिळवला आहे. ‘आत्मा’ असं चित्रपट नाव असून चित्रपटाचे लेखण विक्रम भट करत आहे. राज-३ नंतर विक्रम भट बिपाशासाठी पुन्हा एकदा हॉरर-थ्रिल चित्रपटाची पटकथा लिहितोय.

आत्मा चित्रपटाची पटकथा ‘अंकुर अरोडा मर्डर केस’ या सत्यघटनेवर आधारित आहे. ‘राज-३’मध्ये निगेटीव्ह रोल साकारणाऱ्या बिप्सची इमेज प्रेक्षकांच्या नजरेसमोरून अजूनही हलू शकलेली नाही. त्यामुळेच बिपाशाची ही इमेज कशी बदलायची, याचं कोड सोडवण्यात दिग्दर्शक व्यस्त आहे. लवकरच, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. या सिनेमातली बिपाशा प्रेक्षकांना ‘राज-३’पेक्षा मोठा धक्का देऊन जाईल, असं म्हटलं जातंय. पण, तुम्ही मात्र निश्चिंत राहा कारण हा राज-४ नाही...

‘राज’मध्ये बिपाशा आपल्या नवऱ्याचा एका आत्म्यापासून बचाव करणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेत दिसली होती तर ‘राज-३’मध्ये स्वतःसाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या नटीचं काम केलंय. एकच नाव असलेल्या दोन भिन्न चित्रपटांत बिपाशानं वेगवेगळे रंग मोठ्या खुबीनं भरलेले आपण पाहिलेत. ‘राज-३’च्या शनायापेक्षा राजच्या संजनाला लोकांनी जास्त पसंती दिली होती. बिपाशा आगामी चित्रपटातही बॉल्ड-अट्रेक्टिव दिसेल यात काही शंकाच नाही. तिचा येणारा सिनेमाही सिनेचाहत्यांना नक्कीच आवडेल.

First Published: Friday, September 21, 2012, 13:48


comments powered by Disqus