Last Updated: Tuesday, February 26, 2013, 12:00
www.24taas.com, मुंबईनेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आपला वाढदिवस सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी नेहमी काही ना काही नवीन करते. विचार करा या वेळेस वीणा काय करणार आहे. तर वीणाला यावेळी एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे, जे तिला वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठी मदत करणार आहे.
एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार वीणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ‘द सिटी दॅट नेव्हर स्लीप’ या स्पर्धेत ‘हिरो हंट’मध्ये एका मिनिटात १०० लिप लॉक kiss करून गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तीने या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात वीणा म्हणाली, असे करण्यासाठी मी उत्साहित आहे. अशा प्रकारे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी मी कोणत्याही प्रकारने वाट पाहू शकत नाही. कारण वाढदिवसानिमित्त हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिप्ट असणार आहे. मला खूप आनंद वाटतोय की निर्माता सतीश रेड्डी आणि दिग्दर्शन हारून रशीद यांनी हा वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्याची संधी दिली.
First Published: Tuesday, February 26, 2013, 12:00