पूजा भट्टसाठी `तो` २१ वर्षांपासून जेलमध्ये!, bollywood actor pooja bhatt,s

पूजा भट्टसाठी `तो` २१ वर्षांपासून जेलमध्ये!

पूजा भट्टसाठी `तो` २१ वर्षांपासून जेलमध्ये!
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

फॅन्स चित्रपटसृष्टीतील अनेक हिरो-हिरोईनच्या प्रेमात पडल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. त्यांना भेटण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. तसेच अभिनेत्री पूजा भट्ट हिच्या प्रेमात पागल झालेला एक प्रेमी गेल्या २१ वर्षापासून भारताच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

अभिनेत्री पूजा भट्टचा ‘सडक’ हा चित्रपट बघून तिच्या प्रेमात पडणारा अब्दूल शरीफ हा चाहता पूजा भट्टला भेटण्यासाठी १९९२ मध्ये वाघा बॉर्डरमधून भारतात येण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल त्याला भारतीय जवानांनी पकडले होते. त्यानंतर त्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

तुरूंगातील आधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'अब्दूलला सध्या काहीच आठवत नाहीए, आपण कोणत्या देशाचे आहोत या प्रश्नाचे उत्तर देताना तो कधी इराणचं तर कधी पाकिस्तानचं नाव घेतो... त्याला फक्त दोनच नावं आठवतात, एक म्हणजे त्याचे वडील गुलाम मोहम्मद आणि दुसरं म्हणजे अभिनेत्री पूजा भट्ट...'

आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत याचा पुरावा देऊ न शकल्याने तो गेल्या २१ वर्षांपासून भारतात शिक्षा भोगत आहे. अब्दूलने त्याच्या संपूर्ण शरिरावर पूजा भट्टचे टॅटू गोंदवून घेतलेले आहेत. तो तुरूंगात सर्वांना सिनेमाचे संवाद बोलून दाखवतो. अब्दूल शरीफला आजही अभिनेत्री पूजा भट्टला भेटण्याची प्रचंड ओढ आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 9, 2013, 18:55


comments powered by Disqus