इजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर बॉलिवूड इंट्री, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट,Bollywood Entry in Egypt after 25 years, by `Chennai

इजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर बॉलिवूड इंट्री, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट

इजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर बॉलिवूड इंट्री,  ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट
www.24taas.com , वृत्तसंस्था, कैरो

इजिप्तमधील भारतीय चित्रपटांचा २५ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला आहे. भारतात सुपरहिट ठरलेला शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस` हा चित्रपट गुरूवारी कैरो आणि अलेक्झांड्रिया येथील चित्रपटगृहांत अरेबिक सबटायटल्ससह झळकला.

कैरोमधील भारतीय दूतावास, युनायटेड मोशन पिक्चर्स आणि गौरांग फिल्मसने चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट कैरोमधील आठ आणि अलेक्झांड्रियामधील दोन चित्रपटगृहांत दाखविला जात आहे.

इजिप्तमधील राजकीय संघर्षामुळे हिंदी चित्रपटांना दारे बंद झाली होती. मात्र, आता बॉलिवूडमुळे देशाच्या चित्रपट उद्योगाला चांगली चालना मिळेल, असा विश्वारस येथील वितरकांनी व्यक्त केला आहे.

आता हृतिक रोशनचा ‘क्रिश ३` आणि अमिर खानचा ‘धूम ३` या चित्रपटांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २००९ मध्ये शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान` वगळता गेल्या २५ वर्षांत इजिप्तमध्ये बॉलिवूडचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. झेइंड यांनी सांगितंल की, ‘चेन्नई एक्स्प्रे स’ प्रदर्शित झाल्यामुळे आता केवळ इजिप्तचे बॉलिवूडशी नाते निर्माण होणार नसून, या उद्योगालाही मोठी चालना मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, October 4, 2013, 11:31


comments powered by Disqus