बॉलीवूडमध्ये `इत्तेफाक`, रणबीर साकारणार `काका` bollywood, ranbir and ittefaq

बॉलिवूडमध्ये `इत्तेफाक`, रणबीर साकारणार `काका`

बॉलिवूडमध्ये `इत्तेफाक`, रणबीर साकारणार `काका`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना ऊर्फ काका यांची भूमिका साकारण्याची संधी रणबीरला मिळणार आहे.

चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेली व्यक्तीरेखा पुन्हा नव्याने साकारायला मिळणे, ही एखाद्या कलावंतासाठी अभिमानास्पद बाब असते. अभिनेता रणबीर कपूरला हे भाग्य लाभले आहे.

राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या "इत्तेफाक` या चित्रपटाचा रिमेक तयार होतोय. रणबीर त्यात काकांनी साकारलेली भूमिका चितारणार आहे. दिग्दर्शक रवी चोप्रा यांचा मुलगा अभय चोप्रा या रिमेकचे दिग्दर्शन करणार आहे.

बॉलीवूडमध्ये रिमेकना बॉक्‍स ऑफिसवर चांगला व्यवसाय करता आला नव्हता. त्यामुळे अनेक रिमेक चित्रपटांची निर्मिती लांबली होती. असे असताना अभय चोप्रा "इत्तेफाक`चा रिमेक बनवत आहे.

रिमेकमधील राजेश खन्ना यांच्या भूमिकेसाठी रणबीरची निवड निश्‍चित झाली आहे. नंदा यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी अद्याप कोणत्याही अभिनेत्रीची निवड झालेली नाही.

1969मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राजेश खन्ना, नंदा, मदन पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यश चोपडा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 10, 2014, 14:39


comments powered by Disqus